AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता आणखी एका आमदाराचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा, शिंदेंनी गेम फिरवला

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सोमवारी शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यानंतर आता आणखी एका आमदारने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

मोठी बातमी! खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता आणखी एका आमदाराचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा, शिंदेंनी गेम फिरवला
eknath shinde Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 22, 2026 | 9:43 PM
Share

सोमवारी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला, अखरे शिवसेना ठाकरे गटच्या 6 बडंखोर खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या ही 13 वर पोहोचली आहे. दरम्यान दुसरीकडेे राज्यात आणखी एक महत्त्वाची घडामोडी घडली, जिने सर्व महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं ती म्हणजे आज विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला, सर्व ठिकाणी अपेक्षित निकाल लागले. परंतु ज्या विधान परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, त्या नाशिक विधान परिषदेमध्ये मात्र अनपेक्षित निकाल लागला, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा धक्का दिला आहे.

दरम्यान गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते हे भाजपमध्ये असल्यानं गोकुळ  गीते हे भाजपलाच पाठिंबा देतील असं माण्यात येत होतं. मात्र गोकुळ गीते यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही, परंतु ते आता शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी आमदार असणार आहेत.  पत्रकार परिषद घेऊन गोकुळ गीते यांनी आपली भूमिका जाहीर केली, या पत्रकार परिषदेला मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती होती.

नेमकं काय म्हणाले गोकुळ गीते? 

‘मी पूर्वीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावीत आहे. आमचे बंधू गणेश गीते हे स्थायी समितीचे सभापती असताना अनेकदा माझी आणि साहेबांची गाठभेट झाली आहे. त्यांची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला ते न्याय देतात, त्यामुळे पहिल्यापासून माझी इच्छा होती की, भविष्यात आपण शिंदेंसोबत काम करावं. नरेंद्र दराडे यांच्याबद्दल मतदारांच्या मनात प्रचंड नाराजी होती, ते या ठिकाणी माझ्या निकालामधून दिसून आलं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी गोकुळे गीते यांनी दिली आहे.

श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया 

‘मी गोकुळ गीते यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय झाला आहे. महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला, निवडणुकीमध्ये यश अपयश येत असतं. अशा परिस्थितीमध्ये गोकुळ गीते हे निवडून आले, निवडून आल्या -आल्या एकनाथ शिंदे यांची भेट त्यांनी घेतली. एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे ते प्रभावीत झाले आहेत. ते इथे आपल्या सर्वांसोबत बोलत आहेत. गोकुळ गीते हे येणाऱ्या काळात शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार आहेत, आणि पुढच्या काळात नक्कीच शिवसेना पक्ष वाढीसाठी एकनाथ शिंदे त्यांच्यावर जी काही जबाबदारी देतील, त्या जबाबदारीला न्याय देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, असं यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह