AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UBT MPS Spilt : दिल्लीनंतर आता महाराष्ट्र विधानसभेत मोठा राजकीय भूकंप बाकी आहे का? शिंदे शिवसेनेचं मोठं स्टेटमेंट

UBT MPS Spilt : उद्धव ठाकरे गटाला 2022 पासून लागलेली गळती थांबायच नाव घेत नाहीय. दोन वर्षांपूर्वी निवडून आलेल्या 9 पैकी 6 खासदारांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे. विधानसभेत उद्धव ठाकरे गटाचे 20 आमदार आहेत.

UBT MPS Spilt : दिल्लीनंतर आता महाराष्ट्र विधानसभेत मोठा राजकीय भूकंप बाकी आहे का? शिंदे शिवसेनेचं मोठं स्टेटमेंट
Uddhav Thackeray
| Updated on: Jun 18, 2026 | 10:09 AM
Share

महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या सहा खासदारांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. त्यामुळे यूबीटी शिवसेनेते अस्वस्थतता निर्माण झाली आहे. मागच्या चार वर्षात यूबीटी शिवसेनेत दुसऱ्यांदा फूट पडत आहे. मधल्या काळात बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. खासदारांनंतर आता अनेक उद्धव गटाचे आमदारही पक्षांतर करु शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्त किरण पावस्कर यांनी एक मोठं स्टेटमेंट केलं आहे. “आम्ही तुम्हाला देऊ शकू अशी कुठलीही बातमी आमच्याकडे नाही. पण आमदार जनतेने निवडून दिले आहेत. अनेक आमदार शिवसेनेच्या मतदारांनी निवडून दिले आहेत. अशावेळी निवडून आलेले लोकप्रतिनिधी कुठल्या एक गटाशी संबंधित नाहीत” असं किरण पावस्कर म्हणाले.

“वर्तमानात हे आमदार यूबीटी गटासोबत आहेत आणि त्यांचं नेतृत्व त्यांना सांगतं की, तुम्हाला रहायचं असेल तर रहा नाहीतर इथून निघा. पण आमचं नेतृत्व असं बोलत नाही. एकनाथ शिंदे यांचं स्पष्ट सांगणं आहे की, ज्यांना कोणाला जनसेवेसाठी इथे यायचं असेल ते येऊ शकतात. त्यांचं नेहमीच स्वागत आहे” असं किरण पावस्कर बोलले.

विलयाची औपचारिक घोषणा कधी?

महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्यासाठी पत्र सोपवल्याचं बोललं जातय. या पत्रावर उद्धव ठाकरे गटाच्या सहा खासदारांची स्वाक्षरी आहे. 21 जून रोजी विलयाची औपचारिक घोषणा होऊ शकते.

स्पेशल फ्लाइटने दिल्लीला  

या खासदारांमध्ये मुंबई उत्तर पूर्वमधून निवडून आलेले खासदार संजय दिना पाटील, शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे, परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश अष्टीकर, वाशिमचे संजय देशमुख आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर या खासदारांचा समावेश आहे. शिवसेना यूबीटीच्या बंडखोर खासदारांनी 17 जून रोजी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे मंगळवारी स्पेशल फ्लाइटने दिल्लीला गेले. बंडखोर खासदारांचा गटही दिल्लीत आहे. हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि बंडखोर खासदारांची भेट झाली.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं