AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्या सुरात राज ठाकरे यांचाही सूर, कोणत्या विषयावर एकमत

mns raj thackeray | मनसे नेते राज ठाकरे गुरुवारी ठाण्यात आले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. अनित शाह यांच्या मध्य प्रदेशातील भाषणाला माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरात सुरु राज ठाकरे यांनी मिळवला. अमित शाह यांनी टूर अँड ट्रॅव्हल्स खाते सुरु केले आहे, असा टोला लागावला.

उद्धव ठाकरे यांच्या सुरात राज ठाकरे यांचाही सूर, कोणत्या विषयावर एकमत
raj thackerayImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 16, 2023 | 2:13 PM
Share

अक्षय मंकनी, ठाणे | 16 नोव्हेंबर 2023 : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाने आचारसंहितेत काही बदल केला आहे का? असा सवाल केला आहे. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीत मतदारांना अयोध्येतील रामल्लाचं मोफत दर्शन देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजप मध्य प्रदेश सरकारकडून रामाचे दर्शन मोफत घडवण्यात येणार असल्याचे वक्तव्य अमित शाह यांनी प्रचास सभेत केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने काही कारवाई केली नाही. त्यावरुन अमित शाह आणि आयोगावर उद्धव ठाकरे यांनी हल्ला केला. अमित शाह यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनीही आक्षेप घेतला. अमित शाह यांनी टूर अँड ट्रॅव्हल्स खाते सुरु केले आहे, असा उपरोधिक टोला लागावला. अमित शाह या विषयावर दोन कट्टर राजकीय विरोधक असलेले भावांचे एकमत दिसून आले.

काय म्हणाले राज ठाकरे

अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील भाषणात राम मंदिराचे दर्शन मोफत होणार असल्याचे आश्वासन दिले, त्यावर विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, अमित शाह यांनी टुर एण्ड ट्रॅव्हलस खाते उघडले दिसत आहे. तुम्ही काय कामे केली आहेत, त्यावर निवडणुका लढवा. राम मंदिरावर काय निवडणुका लढवतात. प्राचारात काय कामे केली आहेत ते सांगा.

राज्यात घाणेरडे राजकारण

राज्यात घाणेरडे राजकारण सुरु आहे. मला समजत नाहीये की राज्यात काय सुरु आहे. इतकी घाणेरडी परिस्थिती मी राजकारणात कधीच पाहिली नव्हती. राज्यातील मतदार येणाऱ्या निवडणुकीत काय भूमिका घेणार आहे, हे मला पहायचे आहे. सध्या उमेदवारांना मतदारांची भिती वाटत नाही. त्यामुळे ते हवे ते करतात. राजकीय लोक आता निर्ढावले आहेत. ते कायद्याला आणि मतदारांना जुमानत नाही. फक्त सुशिक्षित म्हणून चालत नाही सुसंस्कृतपण असावे लागते. बहिणीबाई चौधरी कमी शिकलेल्या असल्या तरी त्यांनी जे लिहून ठेवलं तो सुज्ञपणा होता, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना