AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीय द्वेष, राज ठाकरे यांचा शरद पवार यांच्यावर हल्ला

mns raj thackeray | मनसे नेते राज ठाकरे गुरुवारी ठाण्यात आले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पदवीधर निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला. तसेच मनसे सिनेट निवडणूक लढवणार असल्याते त्यांनी सांगितले. राज्यात जातीय द्वेष निर्माण करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीय द्वेष, राज ठाकरे यांचा शरद पवार यांच्यावर हल्ला
raj thackerayImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 16, 2023 | 2:14 PM
Share

अक्षय-मंकनी, ठाणे | 16 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात इतर जातींचा द्वेष निर्माण करण्याचे काम सुरु झाले. त्यानंतरच दुसऱ्या जातींबाबत द्वेष निर्माण करणे सुरु झाले आहे. प्रत्येकाला आपली जात आवडते. त्यामागे अनेक कारणे असतात. खाद्य संस्कृती हे एक कारण आहे. परंतु कोणी इतर जातीचा द्वेष करत नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्वेष केला जात असल्याचे मी १९९९ नंतर  ठाण्यात सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा  उत्तर प्रदेश आणि बिहार होत आहे. राज्यात जातीवाद वाढला आहे.  माझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे. मी कधी जातपात पाहिली नाही. आजपर्यंत कोणत्याही जातीच्या व्यक्तीने कोणत्या जातीचे कल्याण केले? हे सांगा, असे मनसे नेते राज ठाकरे यांनी ठाण्यात शरद पवार यांचे नाव न घेता सांगितले.

मनोज जरांगे यांच्यामागे कोण

राज्यात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आरक्षणासाठी आहे. परंतु कायद्यानुसार असे आरक्षण मिळू शकत नाही, हे मी मनोज जरांगे पाटील यांना आधीच सांगितले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोणीतरी आहे. जरांगे यांच्या मागे कोण आहे? हे कालांतराने समोर येणार आहे.

मराठी पाट्यांचा विषय सरकार काहीच करत नाही

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका का होतात? हे मला आजपर्यंत कळले नाही. मुंबई आणि कोकण मतदार संघाच्या निवडणुका लागल्या. त्याच्या आढावा घेण्यासाठी मी ठाण्यात आला. सिनेट निवडणूक मनसे लढवणार आहे. सण कसे साजरे करायचे आहे. कोर्ट ठरवणार आहे. परंतु कोर्टाने दिलेले आदेश पाळले जात नाही, त्याकडे कोर्टाचे लक्ष नसते. मराठी पाट्यांचा विषयात मनसेमुळे कोर्टाने आदेश दिले. त्यानंतर अनेक शहरांत मराठी पाट्या दिसतात. परंतु त्याच्याविरोधात व्यापारी कोर्टात जातात. महाराष्ट्रात राहणारे व्यापारी मराठी पाट्यांच्याविरोधात भूमिका घेतात. मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकार काय करत नाही.,

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना