AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : शेतकऱ्याच्या वेशात कृषीमंत्र्यांची धडक, खतांच्या काळाबाजाराची पोलखोल

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकरी बनून युरिया खतं मिळत नसल्याचं स्टिंग ऑपरेशन करत पोलखोल केली (Agriculture Minister Sting Operation Fertilizer shop) आहे.

VIDEO : शेतकऱ्याच्या वेशात कृषीमंत्र्यांची धडक, खतांच्या काळाबाजाराची पोलखोल
| Updated on: Jun 21, 2020 | 11:26 PM
Share

औरंगाबाद : कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकरी बनून युरिया खतं मिळत नसल्याचं स्टिंग ऑपरेशन करत पोलखोल केली आहे. शेतकऱ्यांना खतं, बियाणे मिळतात की नाही हे पाहण्यासाठी दादाजी भुसे शेतकरी बनून औरंगाबादेतील एका दुकानात गेले होते. त्यावेळी त्या दुकानदाराने खते शिल्लक असतानाही देण्यास नकार दिला. यानंतर स्वत: कृषीमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांसोबत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला. यानंतर त्यांनी औरंगाबादेतील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले आहेत. (Agriculture Minister Sting Operation Fertilizer shop)

दुकानात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही जर दुकानदार शेतकऱ्यांना खतं, बियाणे यासारखा कृषी माल देत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशा इशारा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे. तसेच गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे कारवाई करायची गरज असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद येथे युरिया मिळत नसल्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत कृषीमंत्र्यांनी औरंगाबादला अचानक भेट दिली. यानंतर जिल्हा यंत्रणेला न कळवता ते थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायझर या दुकानात शेतकरी म्हणून गेले. त्यांनी दुकानात गेल्यानंतर दुकानदाराकडे 10 गोणी युरिया मागितला. मात्र त्या दुकानदाराने युरिया शिल्लक नाही असे सांगितले.

त्यानंतर त्यांनी 10 ऐवजी पाच गोण्यांची मागणी केली, मात्र तरीही त्या दुकानदाराने युरिया नसल्याचे सांगितले. यानंतर कृषीमंत्र्यांनी दुकानामध्ये शिल्लक साठ्याच्या फलकावर युरीया शिल्लक असल्याचं दुकानदाराच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्याच्याकडे स्टॉक रजिस्टरची मागणी केली. तेव्हा त्या दुकानदाराने ते घरी असल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तर दिली.

त्यानंतर कृषीमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दुकानात बोलावून घेतले. युरिया शिल्लक असतानाही तो शेतकऱ्यांना दिला जात नाही, यावर दादाजी भुसेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यानंतर दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केल्यानंतर त्या दुकानात युरीयाच्या 1386 पिशव्या शिल्लक असल्याचे आढळून आले. या दुकानदारावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कृषीमंत्र्यांकडून दुकानदारांना इशारा

या प्रकाराने संतापलेल्या कृषीमंत्र्यांनी औरंगाबाद येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्याच दुकानातून कृषी विभागाच्या सचिवांना फोन करत यंत्रणांनी अधिक प्रभावी कार्यवाही करण्याची गरज असल्याच्या सूचनाही दिल्या. राज्यभरातील कृषी मालाच्या दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करु नये, शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे याबाबी खपवून घेतल्या जाणार नाही, अशा इशाराही कृषीमंत्र्यांनी दिला आहे. (Agriculture Minister Sting Operation Fertilizer shop)

संबंधित बातम्या : 

गरम पाण्याने डोकं थंड करण्यासाठी महाड गाठलं, केंद्रीय पाहणी पथकाच्या प्रमुखांवर सामंतांची नाराजी

फॉर्च्युनरवर पोकलेन कोसळून अपघात, ताफा थांबवून शरद पवारांकडून विचारपूस!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.