फॉर्च्युनरवर पोकलेन कोसळून अपघात, ताफा थांबवून शरद पवारांकडून विचारपूस!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा जात असताना, परिसरात मोठा अपघात झाल्याचं निदर्शनास आलं. (Sharad Pawar stops convoy)

फॉर्च्युनरवर पोकलेन कोसळून अपघात, ताफा थांबवून शरद पवारांकडून विचारपूस!
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 5:41 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा जात असताना, परिसरात मोठा अपघात झाल्याचं निदर्शनास आलं. गर्दी झालेली पाहून शरद पवारांनी आपला ताफा थांबवून चौकशी केलीच, शिवाय नुकसानभरपाई संदर्भात संबंधितांशी लवकर संपर्क करावा, अशा सूचनाही पवारांनी केल्या. पवारांनी धीर दिल्याची भावना यावेळी संबंधितांनी व्यक्त केली. (Sharad Pawar stops convoy)

नेमकं काय घडलं?

मावडी कप (ता. पुरंदर) इथे बप्पा चाचर यांचे पोकलेन मशीन ट्रकमधून उतरवलं जात होतं. त्यावेळी ते भलंमोठं पोकलेन मशीन चाचर यांच्या फॉर्च्युनर गाडीवर पडलं. अवाढव्य पोकलेन मशीन फॉर्च्युनरवर पडल्यामुळे या गाडीचं मोठं नुकसान झालं. केवळ पोकलेन मशीन सुरु असताना अनेक लोक जमतात, मात्र पोकलेन मशीन फॉर्च्युनरवर पडल्याने झालेल्या अपघातावेळी, आजूबाजूला बघ्यांची मोठी गर्दी झाली.

त्यावेळी अनेक लोक मदतीसाठी धावले. त्यादरम्यान तिथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा बारामतीवरुन-पुण्याला चालला होता.

गर्दी पाहून पवारांनी गाडी थांबवून विचारपूस केली. त्यावेळी चाचर आणि उपस्थितांनी पवारांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर शरद पवारांनी नुकसानभरपाई संदर्भात संबंधितांशी लवकर संपर्क करावा अशा सूचना केल्या. (Sharad Pawar stops convoy)

बारामतीत शरद पवार- राजू शेट्टी यांची भेट

दरम्यान, शरद पवार यांच्या बारामती दौऱ्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोनच दिवसापूर्वी त्यांची भेट घेतली होती. विधानपरिषदेच्या जागांबाबत त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय त्यावेळी झाला. मात्र आता राजू शेट्टी यांनी अंतर्गत संघटनावादामुळे आपण विधानपरिषदेवर जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

संबंधित बातम्या 

Raju Shetti Upset | घरच्या कटारीचे घाव जिव्हारी, नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नकोच, राजू शेट्टी उद्विग्न  

गोविंद बागेत ठरलं, राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.