यंत्राच्या बेल्टमध्ये पदर अडकला, डोकं यंत्रावर आदळून विवाहितेचा मृत्यू! 11 महिन्यांचं बाळ पोरकं

सरिता यांना तीन वर्षांचा मुलगा तसेच 11 महिन्यांची लहान मुलगी आहे. या कोवळ्या मुलांना काय घडतंय हे कळतच नव्हतं आईची अशी अवस्था पाहून ती दोघंही धाय मोकलून रडत होती.

यंत्राच्या बेल्टमध्ये पदर अडकला, डोकं यंत्रावर आदळून विवाहितेचा मृत्यू! 11 महिन्यांचं बाळ पोरकं
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 1:32 PM

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) तालुक्यातील नेवासा (Nevasa) येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. जनावरांसाठी कडबाकुट्टी करत असताना दुर्लक्ष होऊन एका महिलेचा पदर कडबा कुट्टी करणाऱ्या यंत्राच्या बेल्टमध्ये अडकला. यंत्रात फिरणाऱ्या बेल्टसोबत महिलाही तितक्याच वेगाने ओढली गेली. मशीनच्या मागील बाजूला तिचे डोके आदळले. महिलेला वाचवण्यासाठी आजूबाजूचे लोक आले. तिला रुग्णालयातही नेण्यात आलं. मात्र रस्त्यातच तिचा मृत्यू (Woman Died) झाला. नेवाशात या अत्यंत हृदयद्रावक घटनेची चर्चा असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुठे घडली विचित्र घटना?

याविषय़ी अधिक मागिती अशी की, अहमदनगर नेवासा तालुक्यातील देवगाव येथे धक्कादायक घटना घडली. या विचित्र अपघातात सरिता अजिनाथ गवते (वय 25 वर्षे) असं या महिलेचं नाव आहे. पती आजिनाथ आणि सरिता दोघे सकाळी सात वाजेच्या सुमारास जनावरांसाठी कडबा कुट्टी तयार करत होते.

यावेळी नजर चुकीने सरिता यांचा पदर कडबा कुट्टी करणाऱ्या यंत्राच्या बेल्टमध्ये अडकला. हा पदर एवढा वेगाने यंत्रात ओढला गेला की. सरिता यांचे डोके मशीनवर मागील बाजूने जोरदार आदळले. त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली. जागेवार रक्तस्राव सुरु झाला. हा विचित्र अपघात पाहून आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले.

हे सुद्धा वाचा

रुग्णालयात नेताना मृत्यू

सरीताचे पती आणि मदतीसाठी आलेल्या लोकांनी त्यांना तत्काळ रुग्णायलायत हलवलं. मात्र अहमदनगर येथील रुग्णालयात जातानाच रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं, हे पाहून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

गाव शोकाकूल

देवगाव परिसरातील नागरिकांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. सरिता यांना तीन वर्षांचा मुलगा तसेच 11 महिन्यांची लहान मुलगी आहे. या कोवळ्या मुलांना काय घडतंय हे कळतच नव्हतं आईची अशी अवस्था पाहून ती दोघंही धाय मोकलून रडत होती. देवगाव येथे सरिता यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.