जणू त्याला मरण समजलं होतं, विसर्जनाला ‘बाप्पा’ मनसोक्त नाचला, घरी गेल्यावर पडला तो उठलाच नाही

एखाद्याचा अचानक मृत्यू झालावर अनेकदा बोललं जातं की त्याला जणू काही मरण आलं हे माहित होतं. अशाच प्रकारची घटना अहमदनगर येथे घडली आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये बेधुंद होऊन तो नाचला घरी गेल्यावर उठलाच नाही. पाहा काय झालं जाणून घ्या.

जणू त्याला मरण समजलं होतं, विसर्जनाला 'बाप्पा' मनसोक्त नाचला, घरी गेल्यावर पडला तो उठलाच नाही
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 8:28 PM

देशभरामध्ये गणपती बाप्पाला आज मंगळवारी मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात निरोप दिला जात आहे. गणेश भक्तांनी मिरवणुकीला हजेरी लावलीय. गेले दहा दिवस झालेले मंगलमय वातावरण आता बाप्पा जात असल्याने प्रत्येक भक्ताचे डोळे पाण्याने भरलेत. प्रत्येकजण आपल्या बाप्पाला निरोप देताना मोठ्या उत्साहाने मिरवणुकीला डान्स करतो. अशाच प्रकारे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे (वय ३६) यांनीही आपल्या गणपतीला निरोप देताना मनसोक्त डान्स केला. पण त्यांच्यासोबत काही तासात असं काही घडेल याचा कोणी विचारही केला नसेल.

नेमकं काय घडलं?

अहमदनगर येथील कोतवाल पोलीस ठाण्यात गणपती बाप्पाची सोमवारी विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीला सर्वा पोलीस गणरायाला आनंदाच्या वातावरणात निरोप देतात. या मिरवणुकीमध्ये पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बाप्पा मोरेसुद्धा सहभागी झाले होते. ज्ञानेश्वर यांनी ही मिरवणुक गाजवली, म्हणजे पांढरा सदरा आणि भगवा फेटे बांधून डान्स केला. त्यांच्य डान्सची चर्चाही झाली. त्यांच्या सहकाऱ्यांनीही ज्ञानेश्वर यांचे मनभरून कौतुक केले.

गणपती बाप्पाला निरोप देताना ‘भीती कोणाची कशाला…’ या मराठी गाण्यावर त्यांनी कमाल डान्स केला. पण रात्री जेव्हा घरी गेले तेहा काही तासातच मोरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना काही वेळात घरच्यांनी रूग्णालयात दाखल केले पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. ज्ञानेश्वार मोरे यांच्या मृत्यू झाल्याने अहमदनगर जिल्हा पोलीस दलावर शोककाळा पसरली आहे.

दरम्यान, गणपती बाप्पासमोर डान्स करणारा हा बाप्पा काही तासांचा पाहुण आहे, असा तिथे उपस्थित कोणीही विचारही केला नाही.  त्यामुळे मरण कधी कोणाला येईल काही सांगता येत नाही.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.