
Anna Hazare: तपोवन वृक्षतोडीविरोधात नागरीक, मराठी कलाकार, विरोधक एकवटले असले तरी प्रशासन आणि सरकार मात्र ठाम असल्याचे दिसते. नाशिक शहरात तब्बल 1 हजार 270 झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या 4 नव्या मलनिस्सारण केंद्रांना ही झाडं अडथळा ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तपोवनातील वृक्षतोडीविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सरकारवर याप्रकरणी टीका केली आहे.
साधु-संत काय झाडावर राहतात काय?
कुंभमेळासाठी येणारे सांधू संत हे जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर राहतात का?असा संतप्त सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. राळेगणमध्ये येथे कोणी झाडाची एक फांदी जरी तोडली तरी मला वेदना होतात. मी कुठेही कोणाला झाडे तोडू देत नाही. असं अण्णा हजारे म्हटले. खरंतर स्वार्थी लोकं वाढत चालले समाज आणि देशाच्या हितासाठी बलिदान करण्याची तयारी कमी होतं चालली असून आमच्यासारखे काही लोकं आहे आणि बलिदान करतील असं मला विश्वास वाटतो असं अण्णा म्हणाले.
लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील
आज जरी लोकं बोलत नसले तरी एक दिवस येईल आणि चीड व्यक्त करत म्हणतील चले जावं, असे अण्णा हजारे म्हणाले. ते दिवस दूर नाही असा इशारा देखील अण्णांनी दिला आहे. कारण जनता मालक आणि तुम्ही सेवक आहे. म्हणून मालकाला अधिकार असतांना मालकाचे अधिकार तुडवणे बरोबर नाही अशी प्रतिक्रिया देत सरकारवर अण्णांनी निशाणा साधला आहे.
साधू महंतनामध्ये नाराजी
पर्यावरण प्रेमींननंतर आता साधू महंत आक्रमक झाले आहेत. तपोवन येथील लक्ष्मीनारायण मंदिर ,साक्षी गोपाळ मंदिर ,शुर्पणखा मंदिर ,सह अनेक मंदिरांना मनपा प्रशासनाकडून नोटीसा रस्त्यासह विकास कामांसाठी नोटीस देण्यात आली आहे. मनपाकडून आता सारवासारव करत चुकून नोटीस पाठवल्याचे सांगितले जात आहे. जर मंदिरात नाही राहिले तर कुंभमेळ्यातील साधू महंत राहणार कुठे? एकीकडे बाबरी मशिद तोडून राम मंदिर बनवण्यात आले आणि इकडे मंदिरांना नोटीस हे राजकारण समजण्यासारखे नाही अशी प्रतिक्रिया महंत राम स्नेहीदास महाराज यांनी दिली आहे.
कर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यासह विविध विकास कामांसाठी आता मनपा प्रशासनाकडून तपोवन येथील अनेक मंदिरांना नोटीसा पाठविण्यात आले आहेत यामुळे मंदिरांच्या साधू म्हणतां मध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळतंय अनेकांकडून नाराजी देखील व्यक्त केली जात असल्याचे महंत राम स्नेहीदास महाराज म्हणाले.
फाशीच्या डोंगरावरील वृक्ष लागवड वादात
महानगरपालिकेने फाशीचा डोंगर येथे केलेली वृक्षलागवड वादाच्या भोवऱ्यात सापडलीये. तपोवन येथील नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 300 ते 400 झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यावरून पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केल्यानंतर नाशिक महानगरपालिकेकडून वृक्षतोडीच्या बदल्यात फाशीचा डोंगर येथे वृक्ष लागवड केल्याचा दावा करण्यात आला होता. फाशीचा डोंगर या ठिकाणी 7300 इतकी झाड लागवड करण्यासाठी जवळपास 75 लाख रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती. मात्र प्रत्यक्षात फाशीच्या डोंगर या ठिकाणी केलेली वृक्ष लागवड ही शास्त्रीय पद्धतीने नसल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलाय. जवळपास 70 ते 80 टक्के झाडं ही वाळलेल्या स्थितीत असून खडकाळ भागात केलेली वृक्ष लागवड बघून पर्यावरण प्रेमींनी संताप केला आहे.