भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध, विखेंची काळेंना रसद, महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय?

अहमदनगरच्या राजकारणात सध्या राधाकृष्ण विखे पाटील आणि आशुतोष काळे यांच्या युतीची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या युतीमुळे भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये नवं राजकीय शीतयुद्ध सुरु झालं आहे. हे शीतयुद्ध सुरु होण्यामागे काही कारणं आहेत. या शीतयुद्धात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचंदेखील नाव समोर आलं आहे.

भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध, विखेंची काळेंना रसद, महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय?
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 8:14 PM

मनोज गाडेकर, Tv9 मराठी, अहमदनगर | 6 डिसेंबर 2023 : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात भाजपच्या विवेक कोल्हे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करत विखे पाटलांना राजकीय विरोध सुरू केला. गणेश कारखाना निवडणूक आणि तीन ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे-थोरात पॅटर्नने विखे पाटलांना धोबीपछाड दिली. मात्र आता राधाकृष्ण विखे यांनी आपला मोर्चा कोपरगाव मतदारसंघात वळवलाय. कोल्हेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत विविध विकासकामांचे भूमिपूजन करत भाजपच्या कोल्हे यांच्या विरोधात काळेंना राजकीय बळ द्यायला सुरूवात केलीय.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे विरुद्ध कोल्हे ही पारंपरिक लढत नेहमीच चुरशीची ठरते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे विवेक कोल्हे हे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर हात मिळवणी करत शिर्डीत विखेंना शह देण्याचा प्रयत्न करताय. विखे यांच्या मतदारसंघातील गणेश कारखाना निवडणूक असेल किंवा नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका यामध्ये विखेंचा पराभव करण्यासाठी विवेक कोल्हे यांनी काँग्रेसच्या थोरात यांना बरोबर घेत कंबर कसल्याच दिसून आलं. मात्र आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगाव मतदारसंघात कोल्हेचे प्रतीस्पर्धी आमदार आशुतोष काळे यांना पाठबळ दिल्याचं दिसतंय. तुमचं पाठबळ असेल तर मला कोपरगावमध्ये काहीच अडचण नाही, असं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

विवेक कोल्हे यांचे विरोधक एकाच मंचावर

संवत्सर गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले. यावेळी झालेल्या नागरिक सत्कार सोहळ्याच्या मंचावर राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांसह राजेश परजणे हे कोल्हेंचे विरोधक एकत्र बघायला मिळाले. माझं पाठबळ तुमच्या पाठीशी असून कुणाचा कसा कार्यक्रम करायचा हे मला माहीत असल्याचं म्हणत विखे पाटील यांनी कोल्हेंवर तोफ डागलीय.

भाजपच्या कोल्हे आणि विखे या दोन नेत्यांमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासूनच मतभेद होते. आता ही राजकीय लढाई सुरू झाली असून एकमेकांना शह देण्यासाठी दोन्हीकडून दंड थोपाटले जात आहेत. भाजपमधील हा अंतर्गत वाद शमवण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आलं नाही तर  कदाचित आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला झटका बसू शकतो. त्यामुळे आगाळी काळात घडणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत.

Non Stop LIVE Update
मुंबईत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा; किंमत ऐकून बसेल धक्का
मुंबईत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा; किंमत ऐकून बसेल धक्का.
'तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मी म्हातारा झालो नाही...',महायुतीला इशारा
'तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मी म्हातारा झालो नाही...',महायुतीला इशारा.
'लाडक्या बहिणी'ना दम देणं महाडिकांना भोवणार? आयोगानं घेतला मोठा निर्णय
'लाडक्या बहिणी'ना दम देणं महाडिकांना भोवणार? आयोगानं घेतला मोठा निर्णय.
'भाजपवाल्यानो... आता पहिले तुमचीच मस्ती जिरवतो', जानकरांना संताप अनावर
'भाजपवाल्यानो... आता पहिले तुमचीच मस्ती जिरवतो', जानकरांना संताप अनावर.
भाजपच्या जाहीरनाम्यात 'लाडक्या बहिणीं'सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
भाजपच्या जाहीरनाम्यात 'लाडक्या बहिणीं'सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा.
'मविआ'चा महाराष्ट्रनामा, जाहीरनाम्यात 'या' पंचसूत्रीसह कोणत्या घोषणा
'मविआ'चा महाराष्ट्रनामा, जाहीरनाम्यात 'या' पंचसूत्रीसह कोणत्या घोषणा.
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी.
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल.
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा.
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?.