AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम, राज्यात मोठा धक्का, बड्या नेत्याचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आज काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाला खिंडार पडलं आहे.

मोठी बातमी! अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम, राज्यात मोठा धक्का, बड्या नेत्याचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश
| Updated on: Aug 17, 2025 | 4:15 PM
Share

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं, राज्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीचे 232 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं, पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं.

दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते हे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करताना दिसत आहेत.

दरम्यान राज्यात आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती, अखेर त्यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. आज जळगावमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला, या मेळाव्यात त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अजित पवार काय म्हणाले? 

आम्ही सत्तेवर असलो तरच निर्णय घेऊ शकतो, आम्ही सत्तेत असलो तर धोरण ठरवू शकतो. प्रतिभा शिंदे ताई तुम्हाला राष्ट्रवादीत येण्याची चूक केली असं कधीही वाटणार नाही,  आमचे सर्व सहकारी तुमच्यासोबत एकत्र काम करतील. गेल्या 35-  40 वर्षांत आम्ही अनेक चढउतार पाहिले,  सत्ता असताना प्रश्न सुटतात, सत्ता नसताना काय अडचणी येतात हे अनुभवलं, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हा पक्ष प्रवेश झाल्यामुळे जळगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद आता वाढणार आहे.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..