AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित पवार, अमोल मिटकरी उचलणार मोठं पाऊल, DGCA विरोधात..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर घातपाताचा संशय बळावला आहे. रोहित पवारांनी VSR कंपनीवर थेट बोट उचलले होते. आता कंपनीवर कारवाई करण्यास विलंब झाल्याने आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी मोठं पाऊल उचललं आहे.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित पवार, अमोल मिटकरी उचलणार मोठं पाऊल, DGCA विरोधात..
अजित पवार विमान अपघात
| Updated on: Feb 25, 2026 | 12:20 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झआलं. 28 जानेवारी रोजी त्यांचं विमान बारामतीजवळ कोसळलं आणि त्यात अजित दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. मुंबईवरून बारामतीला जात असताना अजित पवारांचे विमान लँडिंगच्या आधी कोसळले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. या दुर्दैवी घटनेनंतर घातापाताच संशयही व्यक्त जाला. अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तर अगदी स्पष्ट शब्दांत संशय व्यक्त करत व्हीएसआर कंपनीवर बोटही उचललं. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी हे डीजीसीएच्या विरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करणार आहे. विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीवर तत्काळ कारवाई करणं अपेक्षित असताना, कारवाईला उशीर केल्याने आणि कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना कारवाई न केल्याने गुन्हा नोंद करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी मुंबईत तसेच दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन व्हीएसआर कंपनी, त्यातील त्रुटींवर बोट दाखवलं होतं. तसंच सत्तेतील लोकांचे व्हीएसरच्या मालकांशी चांगले संबंध असल्याचं सांगत त्यांनी या अपघाताच्या तपासात दिरंगाई होत असल्याबद्दलनाराजी वर्तवली होती.

काय म्हणाले रोहित पवार ?

आता याप्रकरणात रोहित पवार व अमोल मिटकरी हे मोठं पाऊल उचलणार आहेत.   मी मरिन ड्राइव्ह येथे जाऊन VSR मालक , ॲरो मालक , अज्ञात व्यक्तींवर आणि DGCA च्या अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे.  एकूण पाच गुन्हे दाखले केले पाहीजेत.  आज जर FIR घेतला नाही, तर आम्ही उद्या बारामतील जाऊन. तिथे लोकांच्या उपस्थितीत जाऊन तिथल्या पीआय समोर जाऊन बसू. एफआयआर होत नाही, तो पर्यंत उठणार नाही असं रोहित पवार म्हणाले.

तसेच येत्या अधिवेशनात दिल्लीत अजित दादांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा पहिले घेतला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.  यासंदर्भात मी राहुल गांधी यांच्याशी बोलणार आहे, एकनाथ शिंदे यांच्याशीही बोलून विनंती करणार आहे असं रोहित पवार म्हणाले.  भाजपवर माझा विश्वास नाही , त्यामुळे भाजपच्या खासदारांकडून काहीही अपेक्षा नाही असंही त्यांनी सुनावलं.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- शशिकांत शिंदेंची मागणी

दरम्यान या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही भाष्य केलं आहे. बारामतीत घटना घडल्यानंतर रोहित पवार जे सातत्याने बोलत होते, त्याची सत्यता आता पटायला सुरुवात झाली आहे. 5 विमानांवर बंदी घातली असेल तरी या कंपनीला परवानगी देणाऱ्या मंत्र्यावर आणि कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...