मी कुठं सांगितलं माझ्या काकाला ‘जाणता राजा’ म्हणा, अजित पवार यांनी भर पत्रकार परिषदेत असं का म्हंटलं?

| Updated on: Jan 04, 2023 | 3:32 PM

शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावरून अनेकदा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावर अजित पवार यांनी आज भाष्य केल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

मी कुठं सांगितलं माझ्या काकाला जाणता राजा म्हणा, अजित पवार यांनी भर पत्रकार परिषदेत असं का म्हंटलं?
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हतेच असं विधान करत अजित पवार यांनी संभाजीराजे स्वराज्यरक्षक होते असं विधान केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरून अजित पवार यांनी या सर्व आरोपांवर आणि राजीनाम्याच्या मागणीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्यरक्षक असलेल्या जीआरचे पुरावे दाखवत मी विधानावर ठाम असल्याचे विधान केले होते. त्याच वेळी त्यांनी धर्मवीर नावाचे अनेक लोक आहेत. काहींच्या नावाचे चित्रपट निघाले असं म्हणत अजित पवार यांनी धर्मवीर वादावर स्पष्टीकरण देत भाजपला काही सवाल केले होते. त्याच दरम्यान अजित पवार यांना शरद पवार यांना जाणता राजा म्हणतात यावर प्रश्न विचारला होता त्यावर अजित पवार यांनी स्पष्टच उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले मी कुठं सांगितलं की माझ्या काकाला जाणता राजा म्हणा म्हणून, अजित पवार यांनी असं म्हणताच हास्यकल्लोळ झाला होता.

खरंतर अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हतेच असे विधान केल्यानंतर त्यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली होती, त्यावर अजित पवार यांनी ते आमचे नेते आहेत आम्ही त्याच्या आदेशाचे पालन करू असे म्हंटले आहे.

अजित पवार यांना एकप्रकारे शरद पवार यांनी सल्ला दिला होता, त्यामुळे अजित पवार यांची अडचण होईल अशी शक्यता होती, पण त्यावर अजित पवार यांनी थेट भाजपवर पलटवार करत हल्लाबोल केला आहे.

हे सुद्धा वाचा

माझ्या राजीनाम्याची मागणी करण्याचा अधिकारी भाजपला नाही, त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी मागणी केलेली बरोबर नाही, पण त्यांनी राज्यपाल आणि वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांवर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान केलं आहे.

अजित पवार यांना याच दरम्यान धर्मवीर उपाधीवर अनेकांना असल्याचे म्हंटले होते त्यावर जाणता राजा असं छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हणतात तेच शरद पवार यांना म्हणत असतात असं विचारलं होतं.

पत्रकाराच्या प्रश्नाला अजित पवार यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे, अजित पवार म्हणाले मी कुठं सांगितलं की माझ्या काकाला जाणता राजा म्हणा.

खरंतर शरद पवार यांना जाणता राजा म्हणणाला मोठा विरोध आहे, त्यावर अनेकदा आक्षेपही घेण्यात आला आहे, आणि नेमकी त्यावरच अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

त्यामुळे अजित पवार यांनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर येऊ शकतो.