AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायलटची अचानक बदली? अजित दादांच्या विमान अपघातावर CM फडणवीसांनी दिली सर्वात मोठी अपडेट

CM Fadnavis on Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी पायलट अचानक बदलले असल्याचे सुरुवातीच्या तपासातून समोर आले होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली आहे.

पायलटची अचानक बदली? अजित दादांच्या विमान अपघातावर CM फडणवीसांनी दिली सर्वात मोठी अपडेट
Fadnavis on Ajit Pawar Plane crashImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 25, 2026 | 6:15 PM
Share

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास वेगाने सुरू आहे. सुरूवातीला या विमानाचे पायलट अचानक बदलले असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेकांनी या विमान अपघातावर शंका उपस्थित केली होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत विधानसभेत माहिती दिली आहे. विमानाचा पायलट अचानक बदलण्यात आला होता का? याबाबत फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

अजित पवार यांच्या विमान अपघातावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 27 जानेवारीला सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारात अजित पवार यांचा मुंबई ते बारामती हा प्रवास निश्चित झाला. या दौऱ्याची माहिती अजित दादांच्या खाजगी सचिवांकडून अॅरो एअर क्राफ्ट सेल्स आणि चार्टड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आली. त्यानंतर 28 तारखेला असणाऱ्या दौऱ्यासाठी 8 वाजून 45 मिनिटांनी व्हीएसआर कंपनीचे विमान बुक करण्यात आले.

विमान उतरण्यापूर्वीच कोसळून अपघात

दुसऱ्या दिवशी सकाळी पायलट सुमित कपूर यांची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट 7 वाजून 9 मिनिटांनी आणि शांभवी पाठक यांची टेस्ट 7.13 वाजता करण्यात आली. यात त्यांनी अल्कोहल सेवन केल्याचे समोर आलेले नाही. त्यानंतर अजित पवार 7 वाजून 52 मिनिटांनी विमानतळावर पोहोचले. सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी विनामाने उड्डाण केले आणि विमान बारामतीला उतरण्यापूर्वी कोसळले. यात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या विमानात स्फोटक पदार्थ नसल्याचे समोर आले आहे, तसेच या विमानातून इंधानाचे कॅन नेल्याचे समोर आलेले नाही.

विमानाचा पायलट बदलण्यात आला का याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी स्लॉट्स अलॉटमेंट झाली. यात कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली होती. अशाप्रकारे क्रूची माहिती देऊन स्लॉट अलॉट करण्याची पद्धत आहे. त्यांनंतर पायलट आणि को पायलटची नेमणूक करण्यात येते अशी माहिती कंपनीने दिली आहे.

पायलट कधी बदलले?

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या दौऱ्यासाठी शेड्यूल रोस्टरमध्ये या दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय आणि दिलीप सिंग यांची पायलट म्हणून रात्री 22 वाजून 42 मिनिटांनी नेमणूक केली. परंतू पायलट राहुल ओबेरॉय यांनी त्यांचे पोट खराब असल्याने त्यांनी सकाळच्या फ्लाईट ऐवजी संध्याकाळी लातूरला जाणाऱ्या विमानाची ड्यूटी देण्याची मागणी केली. त्यामुळे टीमने कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांची नेमणूक केली. या दोघांच्या नावाचे रोस्टर रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवले. त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही पायलटची नेकणूक करण्यात आलेली नव्हती. आदल्या रात्रीच पायलटची नेमणूक करण्यात आली होती. या दोन्ही पायलटने पुरेसा आराम केला होता.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?