
अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातानंतर एका महिन्याने आता या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. यात अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. 22 पानांच्या या अहवालातून धक्कादायक माहितीही समोर आली आहे. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी ते एका झाडावर कोसळले आणि त्यानंतर ते जमिनीवर आदळले असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) यांच्याकडून सुरू आहे. या संस्थेने आपला प्राथमिक अहवाल जारी केला आहे. यात हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे, तर हवामान + पायाभूत सुविधा + ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याची शक्यता आहे अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच अपघाताची अंतिम कारणे CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होतील अशीही माहिती देण्यात आली आहे.
बारामती येथे स्वतंत्र MET (हवामान) सुविधा नाही. विमानतळाच्या टॉवरने दृश्यमानता 3000 मीटर सांगितली होती. परंतु VFR ऑपरेशन्ससाठी किमान 5000 मीटर आवश्यक असते. मात्र विमान अपघातावेळी केवळ 2000 मीटर इतकी दृश्यमानता होती. त्यामुळे या विमान अपघातासाठी हवामान व दृश्यमानता मोठ्या प्रमाणात जबाबदार असण्याची शक्यता आहे असं अहवालातून समोर आलं आहे.
VFR मर्यादेपेक्षा कमी दृश्यमानतेत लँडिंगचा प्रयत्न हा मोठा जोखीम घटक ठरतो. VIP/चार्टर जेटसाठी आवश्यक असलेली मूलभूत सुरक्षा व नेव्हिगेशन उपकरणे अपुरी होती. कमी दृश्यमानता + दृश्य भ्रम + टेबलटॉप धावपट्टी यांच्या एकत्रित कारणामुळेही हा अपघात झाल्याची शक्यता आहे. तसेच अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आत्तापर्यंत तांत्रिक बिघाडाचा थेट पुरावा समोर आलेला नाही, त्यामुळे आता CVR/FDR विश्लेषण निर्णायक ठरणार आहे.