अजितदादांची ताकद वाढली, जिल्हा परिषदेसाठी जोरदार इन्कमिंग; विजयासाठी टाकला सर्वात मोठा डाव!

ZP Election : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच आता राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग झाली आहे.

अजितदादांची ताकद वाढली, जिल्हा परिषदेसाठी जोरदार इन्कमिंग; विजयासाठी टाकला सर्वात मोठा डाव!
NCP Incoming
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 18, 2026 | 5:43 PM

राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. नगरपालिका, नगरपरिषद आणि महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत, त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी महत्त्वाच्या बैठका पार पडत आहे. अशातच आता या आगामी निवडणुकीपूर्वी अजित दादांची दाकत वाढली आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग पहायला मिळाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रायगडमध्ये महत्त्वाची बैठक

आगामी रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्षांनी, संघटन मजबूत करणे, बूथ पातळीवरील तयारी, मतदारांशी थेट संपर्क तसेच आगामी निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या राजकीय रणनितीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

रायगड जिल्ह्यातील जनतेच्या समस्या, विकासकामे आणि पारदर्शक प्रशासन हेच आगामी निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असणार असून, पक्ष संघटना केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता, वर्षभर जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार असल्याचा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. तसेच ही बैठक म्हणजे केवळ निवडणूकपूर्व तयारी नसून, 2026 च्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या व्यापक राजकीय बांधणीची सुरुवात असल्याचेही त्यांनी सांगितले.

अनेकांचा पक्षप्रवेश

आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धोरणांवर आणि पक्षाच्या सामाजिक न्याय, विकासाभिमुख विचारधारेवर विश्वास व्यक्त करत, विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीची जोरदार तयारी

दरम्यान, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरल्याचे पहायला मिळत आहे. अजित पवारांनी अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडले असून 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.