अजित पवारांची झोप उडवणारी बातमी, निकालानंतर पहिल्याच दिवशी मोठं खिंडार, बडा नेता भाजपच्या गळाला
Ajit Pawar : जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षाला खिंडार पडले आहे. एका बड्या नेत्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राज्यातील महानगर पालिकांचे निकाल जाहीर झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेले नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर अजित पवारांनी खास लक्ष केंद्रात केले होते. मात्र या दोन्ही ठिकाणी भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीनंतर आता लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. इंदापूरमध्ये पक्षाला खिंडार पडले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अजित पवारांना मोठा धक्का
इंदापूरमधील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलआप्पा ननवरे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, विद्यमान नगरसेवक काकाशेठ शेटे- पाटील, गणेश राऊत, सुधाकर ढगे, संजय शिंदे, वसीमभाई बागवान, हाजी नवाब बागवान, अनिल पवार, माजी नगरसेवक अविनाश मखरे, माजी नगरसेवक व माजी जिल्हाध्यक्ष अनिल राऊत, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, लाखेवाडी गावचे माजी सरपंच प्रभाकर खाडे, निमगाव केतकी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य माजी वैभव जाधव, नरसिंपूर गावचे माजी सरपंच श्रीकांत दंडवते, ओबीसी सेलचे युवक अध्यक्ष महेश जठार, सामाजिक कार्यकर्ते उमेश क्षिरसागर, सामाजिक कार्यकर्ते समीर देशमुख, रासपचे इंदापूर शहराध्यक्ष हुसेन मुलाणी, सामाजिक कार्यकर्ते गोरख पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
Municipal Election 2026
काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा आमदार विश्वजीत कदमांनी केला सत्कार
केडीएमसीमध्ये निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांची बैठक
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
BMC Election Result 2026 : मुंबईच्या कुठल्या भागांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली? 65 नगरसेवक म्हणजे किती आमदार झाले ?
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
इंदापूर तालुक्यातील (जि.पुणे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपा परिवारात प्रवेश!
📍पक्ष प्रवेश करणारे मान्यवर- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलआप्पा… pic.twitter.com/CG483X58hh
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) January 17, 2026
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे, आमदार श्रीकांत भारतीय यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेली रवींद्र चव्हाण यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशाचा फायदा भाजपला आगामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
मिरजमध्येही भाजपची ताकद वाढली
आज मिरज विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब होनमोरे, अस्मिताताई होनमोरे, सांगली जिल्हा परिषदेतील कृषी समितीचे माजी सभापती राजेंद्र माळी, बेडग गावचे ग्रामपंचायत सदस्य विष्णू पाटील, सुरज खाडे, तुकाराम निकम, मोहन पाटील, दिनकर पाटील आणि अनिकेत पाटील यांचा समावेश आहे.
