AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी!निवडणूक आयोगाला हाताशी धरून आमचा पराभव, अजितदादांच्या गोटातून पहिला बॉम्ब, या बड्या नेत्याचा संताप

Pune Municipal Corporation Election Result: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील निकालाने राष्ट्रवादीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरूनच आमचा पराभव केल्याची तिखट प्रतिक्रिया अजितदादांच्या गोटातून आली आहे. स्थानिक नेत्यांच्या संतापाचा कडेलोट झाल्याचं दिसून येत आहे.

मोठी बातमी!निवडणूक आयोगाला हाताशी धरून आमचा पराभव, अजितदादांच्या गोटातून पहिला बॉम्ब, या बड्या नेत्याचा संताप
अजितदादा, देवेंद्र फडणवीसImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 17, 2026 | 6:43 PM
Share

लक्ष्मण जाधव/ प्रतिनिधी: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील आकडे बरंच काही सांगून जातात. या दोन्ही ठिकाणी भाजपने जोरदार मुसंडी मारली. पुण्यात भाजपने 120 जागा पटकावल्या. या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी 29 जागांवरच अडकली. तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने 84 जागांची कमाई केली. याठिकाणी राष्ट्रवादीला 37 जागा मिळाल्या. अजितदादांच्या राष्ट्रवादीने दोन्ही ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा चांगली कामगिरी केली. पण होमपिचवर दादांना (Pimpri Chinchwad Municipal Corporation Result) यशाने हुलकावणी दिली. निकालानंतर अजितदादांच्या गोटातून सर्वात पहिला बॉम्ब टाकण्यात आला आहे.

पराभवानंतर भाजपवर संताप

Live

Municipal Election 2026

06:30 PM

Kdmc मध्ये निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांची ठाण्यात बैठक

06:15 PM

रक्तबंबाळ तरुणाला पोलीस ठाण्यासमोर बसून ठिय्या आंदोलन

05:46 PM

BMC Election Result 2026 : मुंबईच्या कुठल्या भागांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली? 65 नगरसेवक म्हणजे किती आमदार झाले ?

04:59 PM

Mumbai Election Result 2026 : मुंबईतील शिंदेंचे नगरसेवक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जमायला सुरुवात

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

राष्ट्रवादीचे नेते अजितदादांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुणे-पिंपरी चिंचवडमधील विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. पण रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपवर तोफ डागली आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा यांना हाताशी धरून भाजपाने आमचा पराभव केला. हा पराभव मान्य नाही.हा जनतेचा कौल नाही हा भाजपा ने दिलेला कौल आहे. आमचा पराभव हा भाजपने केलेला ईव्हीएम मशीन मधला घोटाळा, भाजपने विरोधात असलेल्या पक्षांचे केलेले विभाजन, सत्तेचा केलेला गैरवापर, पोलिसांची घेतलेली मदत, सत्तेचा गैरवापर करून केलेला हा पराभव आहे, अशी टीका ठोंबरे यांनी केली. आम्ही हरलेलो नाहीत. भाजपाने जग जिंकलेलं नाही. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक चालवण्याची अधिकाऱ्यांची जबाबदारी पाहिजे. ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड करण्यात आली. लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला.

अधिकाऱ्यांवर कारवाई करा

प्रभाग क्रमांक 25 मधील मतमोजणी केंद्रावर असलेल्या भ्रष्ट निवडणूक अधिकार्‍यांवरती कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. लेखी निवेदन घेत नसल्याने मला मतमोजणी केंद्रावर असलेल्या जाळीवरती चढाव लागलं. काही भक्त मला सोशल मीडियावर मला ट्रोल करत आहेत. पण मला माझा अधिकार मिळवण्यासाठी हे पाऊल उचलावं लागलं. ट्रोलर्स यांना सोशल मीडियावरती बोलायला काही जात नाही. ते फुकटे आंध भक्त मत्सर करणारे आहेत. आक्षेपावर प्रत घेण्यासाठी मला जाळीवर चढावे लागलं. जाळीवर चढणे लोकांना तो स्टंट वाटत असेल तर मी त्यांना सांगेल लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आई-वडिलांना स्मरून असे स्टंट करा, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.

तुतारीचा फटका बसल्याचा आरोप

ईव्हीएम मशीन मुळे जिंकलेली जी भाजपची मंडळी आहे त्यांना भीक मध्ये मिळालेलं हे जिंकणं आहे, अशी सडकून टीका ठोंबरे यांनी केली. लोकशाहीचा गळा दाबून जे जिंकले त्यांची लायकी शून्य आहे. दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या लढलेल्या आहेत एकत्रित लढल्या नाहीत असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. मला प्रभाग क्रमांक 26 मध्ये तुतारीचा फटका बसला. तुतारीच्या पायल चव्हाण मुळे माझी हजार मते गेली असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. ज्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर निवडणूक राबवली त्याच्यावरती कधी गुन्हा दाखल करणार असा सवाल त्यांनी केला.

रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल
रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल.
आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद
आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद.
शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा.
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर.
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी.
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत.
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल.
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'.
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट.