AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडे यांच्यावर मोठं संकट, पक्षाच्याच आमदारांची अजित पवार यांच्याकडे राजीनाम्याची मागणी, सूत्रांची माहिती

सीआयडीने मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाला अटक केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे. विरोधक पाठोपाठ आता त्यांच्याच पक्षाच्या काही आमदारांनी देखील अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे प्रकरण मराठा समाजाच्या रोषाला कारणीभूत ठरू शकते, अशी भीती मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर मोठं संकट, पक्षाच्याच आमदारांची अजित पवार यांच्याकडे राजीनाम्याची मागणी, सूत्रांची माहिती
प्रातिनिधिक फोटो
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 03, 2025 | 7:21 PM
Share

मंत्री धनंजय मुंडे यांच्यामागचं शुक्लकाष्ट काही केल्या कमी होताना दिसत नाही. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना सीआयडीने अटक केली आहे. या प्रकरणात विरोधकांकडून थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला जातोय. भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत या प्रकरणाची इत्यंभूत माहिती दिली. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील विधानसभेत रोखठोक भूमिका मांडली. यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे सातत्याने निशाणा साधण्यात आला. तसेच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. विशेष म्हणजे आता त्यांच्या पक्षातील आमदारांकडूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यामागचं संकट काही कमी होताना दिसत नाही.

अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

“मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या”, असं मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. धनंजय मुंडे यांची आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत असलेल्या जवळकीमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आमदारांनी अजित पवारांना नेमकं काय म्हटलं?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागू नये, त्याचबरोबर ही एकाधिकारशाही मोडीत काढावी, अशी मागणी मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांच्याकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे.

विशेष म्हणजे तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदापासून दूर राहावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी याआधीदेखील केली आहे. “वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास होईपर्यंत आणि आरोपींना शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदापासून दूर राहावं, नाहीतर पक्षश्रेष्ठींनी त्यांना काढावं”, असं प्रकाश सोळंके माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर म्हणाले आहेत. मराठवाड्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकूण 5 आमदार आहेत. यामध्ये बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, राजू नवघरे, राजेश विटेकर आणि प्रकाश सोळंके यांचा समावेश आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी