AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं, चारच दिवसांपूर्वी अजितदादा बोलले अन् अपघात, मनाला चटका लावणारी एक्झिट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे, त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे, दरम्यान आता अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वी आपल्या भाषणात केलेलं एक विधान समोर आलं आहे.

काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं, चारच दिवसांपूर्वी अजितदादा बोलले अन् अपघात, मनाला चटका लावणारी एक्झिट
Ajit PawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 28, 2026 | 9:21 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. ते मुंबईवरून बारामतीला निघाले होते. बारामतीमध्ये विमान धावपट्टीवर उतरत असताना नियंत्रण सुटून हा अपघात झाला, विमान जमिनीला धडकलं, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दरम्यान हा अपघात घडण्यापूर्वी चार दिवस आधीच अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं. काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं, तुम्ही -आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नितीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं, आणि त्यानंतर चारच दिवसांमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या त्या भाषणाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

नेमकं काय म्हणाले होते अजितदादा? 

चारच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मोठं विधान केलं होतं.  काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं, चार दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं. आणि आज ही मन हेलावणारी घटना घडली आहे. ‘कोण कायमचं राहणार आहे? तुम्ही -आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नितीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. परंतु आपण आपल्या हयातीमध्ये काम करत असताना, राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचं असतं. पण ज्याच्यामधून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे, ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. मित्रांनो हे जग कायमचं राहणार आहे, तुम्ही आम्ही आज,असू उदया नसू, असं त्यांनी म्हटलं होतं.  त्यानंतर आज अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आहे.

बारामतीमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी 

अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच अजित पवार यांचे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी पहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांनी बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, नेते देखील बारामतीमध्ये दाखल झाले आहेत, नेत्यांना देखील आश्रू अनावर झाले आहेत.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?