
नाशिक : वेदांता-फॉक्सकॉन समूहाने सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये (Gujrat) सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर आता त्यावर राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने (NCP) महसूल कार्यालयासमोर आंदोलन करत निदर्शने केली आहेत. वेदांता व फॉक्सकोन प्रकल्प केंद्र शासनाने (Central Goverment) गुजरातला घेऊन जात महाराष्ट्रातील जनतेला धोका दिल्याच्या आरोप करत राष्ट्रवादीने पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिकरोड (Nashik) येथील महसूल आयुक्त कार्यालय समोर तीव्र निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली. वेदांता – फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
जवळपास 1 लाख 58 हजार कोटी रुपयांचा वेदांता – फॉक्सकॉनचा प्रकल्प हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या तळेगाव येथे होणार होता.
अचानक हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे समोर आल्याने सदरचा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर सुमारे एक लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असता.
प्रकल्प आता गुजरात येथे हलविण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील युवकांना जो बेरोजगार मिळणार होता तो आता मिळणार नाही असे राष्ट्रवादीने आंदोलना दरम्यान म्हंटले आहे.
परिणामी सदरचा प्रकल्प गुजरातला हलविण्याच्या निषेधार्थ नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने येथील महसूल आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येऊन आंदोलन करण्यात आले
याप्रसंगी केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. याशिवाय शिंदे – फडणवीस सरकारवर राष्ट्रवादीने सडकून टीका केली आहे.
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अंबादास खैरे, गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.