दुर्दैवी! नदी ओलांडतांना बॅटरी संपली… नंतर सापडला महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह…

तन्वीला पुरपरिस्थितीचे गांभीर्य व पाण्याचा अंदाज न आल्याने तिने आपली बँटरीवरील स्कुटी पाण्यात घातली अन् तीथेच घात झाला.

दुर्दैवी! नदी ओलांडतांना बॅटरी संपली... नंतर सापडला महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह...
Image Credit source: TV9 Network
किरण ताजणे

|

Sep 20, 2022 | 12:18 PM

नाशिक : नाशिकच्या निफाड तालुक्यातील महाविद्यालयीन तरुणीचा (Student) पुराच्या पाण्यात वाहून जात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रानवड साखर कारखाना येथे असलेल्या काकासाहेब वाघ (KKW) कनिष्ट महाविद्यालयात अकरावीमध्ये तरुणी शिक्षण घेत होती. तन्वी विजय गायकवाड असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. निफाड (Niphad) तालुक्यातील रुई या गावातील मुळ रहिवासी असलेली 17 वर्षीय तन्वी आपल्या मामाकडे राहत होती. तन्वी शिवडी येथून काकासाहेब नगर येथे दररोज स्कूटीवर ये जा करत होती. मात्र, दोन्ही गावाच्या मधून वाहणारी विनता नदीला पाणी अचानक वाढल्याने त्यात तन्वी वाहून गेल्याने तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जाते आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. त्यातच काही नद्यांना पूर आला आहे.

उगाव – खेडे या दोन्ही गावातील विनता नदीला पुर आलेला असतांना तन्वी हिने आपली दुचाकी पूलावरून नेण्याचा प्रयत्न केला होता.

तन्वी हि सकाळी 7 वाजता महाविद्यालयात जात असतांना नदी पार करत होती त्याचवेळी पाण्यात असतांनाच तिच्या दुचाकीची बॅटरी संपली.

बॅटरी संपल्याने तीने दुचाकी धरूनच ठेवल्याने दुचाकीसह तन्वी ही पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

तन्वीला पुरपरिस्थितीचे गांभीर्य व पाण्याचा अंदाज न आल्याने तिने आपली बँटरीवरील स्कुटी पाण्यात घातली अन् तीथेच घात झाला.

पाण्याने स्कुटीसहित तिला वाहुन नेले. शेवटी ती तेथुन काही अंतरावर असलेल्या संत जनार्दन स्वामी पर्णकुटीजवळ दिसली.

तातडीने तिला निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यापुर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती.

अतिशय शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तन्वी ज्या कॉलेजमध्ये शिकत होती तिथेच तिचे वडील विजय गायकवाड हे ग्रंथपाल म्हणून नोकरी करतात.

आपल्या वडिलांच्या शाळेतच आपण शिक्षण घ्यावे म्हणून तन्वीने अकरावी सायन्सला काकासाहेबनगर येथे प्रवेश घेतला होता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें