कोरोना नंतर ‘या’ आजाराने डोकेदुखी वाढवली, नाशिकमध्ये 22 जणांचा घेतला बळी…

कोरोना प्रमाणेच साधर्म्य असलेल्या स्वाइन फ्ल्यूने आता चिंता वाढवली आहे. नाशिकमधील स्वाइन फ्ल्यूच्या मृत्यूचे प्रमाण बघता आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

कोरोना नंतर 'या' आजाराने  डोकेदुखी वाढवली, नाशिकमध्ये 22 जणांचा घेतला बळी...
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 11:23 AM

नाशिक : कोरोना सारखीच लक्षणे असलेल्या स्वाइन फ्ल्यू (Swine flu) आजाराने पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. नाशिकच्या (Nashik) आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली असून 22 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे कोरोना सारखीच लक्षणे असलेल्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, तातडीने शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) उपचारासाठी दाखल व्हा असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मृतांचा आकडा हा जास्त दिसत असल्याने आरोग्य विभागाने त्याचे वर्गीकरण करत शहर आणि ग्रामीणसह बाह्य असे विभाजन करत आकडेवारी सादर केली आहे. त्यात आत्तापर्यंत बाधितांचा आकडा 144 वर पोहचला आहे.

कोरोनाशी साधर्म्य असलेल्या स्वाइन फ्ल्यूने आरोग्य प्रशासानाची डोकेदुखी वाढवली स्वाइन फ्ल्यू थैमान घालणार नाही याची दक्षता घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.

संततधार आणि सूर्याचे दर्शन होत नसल्याने साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाशिकमधील परिस्थिति बघता अधिकची चिंता वाढली आहे.

जून महिन्यात 2, जुलै महिन्यात 28, ऑगस्ट महिन्यात 102 तर सप्टेंबरमध्ये 12 असे आत्तापर्यंत शहरात 144 जण बाधित आढळून आले आहे.

नाशिक शहराबरोबरच बाह्य रुग्ण देखील नाशिकमध्ये दगावल्याची नोंद आहे. त्यात ग्रामीण भागातील रुग्णांचा देखील समावेश आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस होत आहे त्यातच सूर्यदर्शनही दुर्मिळ झाल्याने साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा तर्क प्रशासनाकडून लावला जात आहे.

डेंगीबाधितांचाही आकडा वाढला –

संततधार पावसामुळे डेंगी आजारचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात आढळून येतात. शहरात आत्तापर्यंत 230 रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर महिन्यात या आजाराचा प्रभाव जास्त दिसून येत आहे.

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.