AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : राम तुमच्या बापाचा आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

Uddhav Thackeray : "बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला किंमत द्या. ती तुम्हाला तारेल. बुवा काही करू शकत नाही. बुवांचं ‘जंतर मंतर’ वेगळं आणि हे ‘जंतर मंतर’ वेगळं. बुवाच्या ‘जंतर मंतर’ने कारभार होऊ शकत नाही" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : राम तुमच्या बापाचा आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल
Uddhav Thackeray Interview
| Updated on: Jul 26, 2026 | 8:57 AM
Share

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सीजेपीचं आंदोलन सुरु होतं. या आंदोलनाला काल यश मिळालं. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला दोन्ही ठाकरे बंधुंनी पाठिंबा दिला होता. आज दिल्लीत सुरु असलेल्या सीजेपी आंदोलनाच्या समर्थनासाठी ते दादर शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढणार होते. पण त्याआधी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यामुळे दादरच्या वीर सावरकर मार्ग आज ठाकरे बंधुंची जल्लोष सभा होणार आहे. या सभेआधी उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यात ते विद्यार्थी आंदोलन, जंतर-मंतर या बद्दल बोललेच आहेत. पण राम मंदिर दान चोरीच्या विषयावरही भाष्य केलं आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत घेतली आहे.

अयोध्येत अनेकांच्या त्यागातून, संघर्षातून, बलिदानातून जे राममंदिर उभं राहिलं, त्या मंदिरातील 550 कोटींच्या दानपेट्या चोरीला गेल्या. हे मंदिर मोघलांनी लुटलंय का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “‘नीट’चे पेपर आणि मंदिराची दानपेटी ही मोघलांनी लुटलीय, पाकिस्तानने लुटलीय की नेहरूंनी लुटलीय? पेपर नेहरूंनी फोडलेत का? दानपेटी नेहरूंनी फोडली का? ही दोन्ही पापं भाजपची आहेत. आता यांचा मुखवटा गळून पडतोय. ज्या मंदिराच्या नावाने यांनी मतं मिळवली त्या मंदिरातील दानपेटी फोडतायत, ते मंदिर लुटतायत. ज्या तरुणांना भविष्याची स्वप्नं दाखवून मतं मिळवली त्या तरुणाईला चिरडतायत. या दोन्ही गोष्टी भाजपच्या नासलेल्या, सडलेल्या वृत्तीचं प्रतीक आहेत. उज्जैनमध्ये, अयोध्येत जमीन घोटाळा झालाय. या देशात युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त बोकाळली आहे” अशा शब्दात भाजपवर हल्लाबोल केला.

बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला किंमत द्या

ही सगळी बुवा शक्ती भाजपच्या हिंदुत्वात सामील झालीय का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “हो… या बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला किंमत द्या. ती तुम्हाला तारेल. बुवा काही करू शकत नाही. बुवांचं ‘जंतर मंतर’ वेगळं आणि हे ‘जंतर मंतर’ वेगळं. बुवाच्या ‘जंतर मंतर’ने कारभार होऊ शकत नाही. त्यांचं ‘जंतर मंतर’ आता उतरलं आहे लोकांवरून”

फालतू गोष्टीत नाक खुपसायला वेळ आहे तुम्हाला

हा मंदिर लुटीचा विषय तुम्हाला किती गंभीर वाटतो? “अतिशय गंभीर आहे. शेवटी हे कोणत्या आधारावर सत्तेत आलेत. रामाच्या नावावरच त्यांचे राजकारण तरारले. आज आम्हाला अनाहूत सल्ले दिले जातायत. मंदिर लुटीचं राजकारण करू नका… तुम्ही कोण सांगणार आम्हाला राजकारण करू नका म्हणून. हिंदुत्वावर सल्ले देतात. कशासाठी? तुम्ही तुमचं काम करा ना. फालतू गोष्टीत नाक खुपसायला वेळ आहे तुम्हाला… त्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या. आमच्या कामात तुम्ही ढवळाढवळ नाही करायची. आम्ही तुमच्या कामात करतो का?” असा उलटा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

राम तुमच्या बापाचा आहे का?

रामाचे संरक्षण करणारे तुम्ही कोण? तुम्हाला अधिकार दिला कोणी? यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं की, “आम्ही रामभक्त आहोत. राम तुमच्या बापाचा आहे का? राम आमच्या सगळ्यांचा आहे. तुम्ही रामाच्या आडून पापं करताय. आम्ही रामरक्षक आहोत. आमच्या रक्षणासाठी आम्ही ज्या रामाचा धावा करतो, आज त्याच्या रक्षणाची वेळ आमच्यावर आलीय. यालाच तर कलियुग म्हणतात”

Follow Us
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...