AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shirdi Saibaba : शिर्डीत साईबाबांच्या प्रसादाच्या दरासंदर्भात महत्वाची अपडेट

Shirdi Saibaba : साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना आता प्रसादासाठीही अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Shirdi Saibaba : शिर्डीत साईबाबांच्या प्रसादाच्या दरासंदर्भात महत्वाची अपडेट
Shirdi Sai baba
| Updated on: Aug 24, 2026 | 12:05 PM
Share

सध्या साखरेचे दर वाढत चालले आहेत. त्याची झळ शिर्डीतील प्रसादाला सुद्धा बसण्याची शक्यता आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यांना आता प्रसादासाठीही अधिक पैसे मोजावे लागू शकतात. साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम शिर्डीतील पेढे आणि इतर प्रसादाच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. होलसेल मार्केटमध्ये साखरेच्या दरात तब्बल 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने शिर्डीतील प्रसाद विक्रेते व्यापारी दरवाढीचा विचार करतायत. तर दुसरीकडे साईबाबा संस्थानने लाडू विक्री दरात सध्या वाढ केलेली नाही.

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसाद म्हणून पेढे आणि इतर मिठाई खरेदी करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. शिर्डी शहरात सहाशेहून अधिक प्रसाद विक्रेते आणि व्यावसायिक असून, सध्या शिर्डी नगरपंचायतीने निश्चित केलेल्या दरानुसारच प्रसादाची विक्री सुरू आहे. मात्र,होलसेल बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने प्रसाद निर्मितीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा भार व्यापाऱ्यांवर पडत असून, आगामी काही दिवसांत प्रसादाच्या दरवाढीसंदर्भात व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी असोशिएनचे रवि गोंदकर यांनी दिलीय.

शिर्डी हे देशातील एक मोठ तीर्थक्षेत्र

शिर्डी हे देशातील एक मोठ तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी भारतासह जगभरातून कोट्यवधी भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. काही खास सणांच्यावेळी उदहारणार्थ गुरुपौर्णिमा, दसरा यावेळी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी असते. साईबाबांवर अपार श्रद्धा असणारे कोट्यवधी भक्तगण आहेत. आता भाविकांना वाढत्या साखर दरांमुळे अजून जास्त किंमतीला प्रसाद खरेदी करावा लागू शकतो.

Follow Us
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
मोठी बातमी! पंजाब, UP सह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या...
मोठी बातमी! पंजाब, उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे नवे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या तयारीत
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान