इंडिया आघाडीही मोदींच्या पाठिशी…पवारांच्या पाठिंब्यानंतर राहुल गांधी अन् ठाकरेंना भाजपनं डिवचलं

राहुल गांधींच्या नेतृत्वावरून अमित साटम यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ठाकरे बंधूंबाबत त्यांनी नेमकं काय म्हटलं?

इंडिया आघाडीही मोदींच्या पाठिशी...पवारांच्या पाठिंब्यानंतर राहुल गांधी अन् ठाकरेंना भाजपनं डिवचलं
Amit Satam Rahul Gandhi Uddhav Thackeray Raj Thackeray
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 4:29 PM

देशामध्ये सध्या मतदारसंघ दुरुस्ती विधेयकावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. या विधेयकाला पारित करण्यासाठी मोदी सरकारने सोमवारपासून विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या विधेयकाला डीएमकेने पाठिंबा दिला आहे. शरद पवारांचा पक्षही या विधेयकाच्या बाजूनेच असल्याचे आता जवळपास स्पष्ट होत आहे. पण हे पक्ष या विधेयकाच्या बाजूने पक्ष उभे राहत असून आता राहुल गांधी यांचा चुकीचं नॅरेटिव्ह उघडं पडलं असल्याची टीका भाजप नेते अमित साटम यांनी केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवरही यावेळी बोचरी टीका केली आहे.

राहुल गांधी यांच्याकडून देशात चुकीचं नॅरेटिव्ह पसरवलं जात असल्याचा आरोप भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला. डिलिमिटेशनसारख्या देशाच्या हिताच्या निर्णयाला इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडूनही पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या भूमिकेला आघाडीतूनच समर्थन मिळत नसल्याचे चित्र असल्याचे साटम म्हणाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत देशातील जनतेचं मत स्पष्ट असल्याचा दावाही त्यांनी केला.

Loading...

शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना अमित साटम यांनी इंडिया आघाडीतील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. देशाच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत आणि त्याला इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्ष पाठिंबा देत आहेत. भविष्यातही असे निर्णय घेतले गेले तर अनेक पक्ष त्याला पाठिंबा देतील, असे ते म्हणाले.

ठाकरे बंधूंवरही निशाणा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरही अमित साटम यांनी टीका केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आता तोंड दाखवण्यासाठी जागा राहिलेली नाही. कुठे तोंड लपवू, अशी त्यांची अवस्था झाली आहे, असे ते म्हणाले.

‘उबाठा बचाव’ करावा लागेल

उद्धव ठाकरे यांच्यासोबत हिंदुस्थानच्या इतिहासात कधी घडले नाही, असे घडले आहे. त्यामुळे आता त्यांना ‘उबाठा बचाव’ करावा लागेल, असा टोला अमित साटम यांनी लगावला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश पुढे जात असून, इंडिया आघाडीतील घटक पक्षही मोदी यांच्या विकासाला पाठिंबा देत असल्याचे ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us