AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Shah : अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक अन् भारताचं संविधान; अमित शाह यांच्या भाषणातील 5 मोठे मुद्दे

अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात टिळक पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यातील सभेत अमित शहा यांनी महत्वाचं भाष्य केलं.

Amit Shah : अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक अन् भारताचं संविधान; अमित शाह यांच्या भाषणातील 5 मोठे मुद्दे
| Updated on: Aug 01, 2026 | 2:42 PM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुण्यातील टिळक पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. पुण्यातील शेकडो पोलिसांच्या सुरक्षेत टिळक पुरस्कार सोहळा सुरू झाला. या सोहळ्यातील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीला अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीस जयंतीदिनी अभिवादन केलं. या सोहळ्याच्या भाषणात अमित शाह यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

अमित शाह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

‘टिळक शिक्षक अन् प्रखर पत्रकार’

पुण्यातील या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन केलं. तसेच त्यांच्या कार्याला उजाळा दिला. तसेच कार्याची स्तुती केली. त्यानंतर लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीसही अभिवादन केलं. अमित शाह म्हणाले, ‘टिळकांनी स्वराज्यासाठी आयुष्य खर्च केलं. त्यांनी स्वराज्याच्या आंदोलनासोबत जनतेला जोडण्याचं काम केलं. त्यांनी स्वातंत्र्यांच्या आंदोलनात नव्या प्रकारच्या राष्ट्रवादाला जन्म दिला. सांस्कृतिक राष्ट्रवादाची निर्मिती केली. अनेक लोक राष्ट्रवादी आहेत. पण टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवयंती सुरू केली. देशाला कोणत्या मार्गाने जायचं याची दिशा दिली. हा देश जेव्हा स्वातंत्र्य होईल, तेव्हा याच मार्गावर चालेल. त्यांची दुरदृष्टी पाहा. देश आज सांस्कृतिक राष्ट्रवादावर चालत आहे. आता त्याला कोणी मागे खेचणार नाही. टिळक शिक्षक होते. प्रखर पत्रकार आहेत. ते निर्भिड होते. मोठे चिंतक होते. त्यांनी भारताची आत्मा आणि विवेक जनतेसमोर आणण्याचं काम केलं’.

तरुणांनी टिळकांची गीता वाचावी – अमित शाह 

‘मला गुजरातीत गीता मिळाली. टिळकांनी लिहिलंय. माझं तरुणांना आवाहन आहे. तुम्ही टिळकांची गीता वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही. मी गॅरंटी देतो. हा ग्रंथ भगवदगीतेचा व्यावहारिक स्वरूप आहे. सामान्य माणूस भगवतगीता कशी जगू शकतो. त्याचं व्यवहारीक स्वरुप त्यात आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

इंग्रज केसरी-मराठाला घाबरायचे – अमित शाह 

‘इंग्रज कोणत्या पेपरला घाबरायाचे तर केसरी आणि मराठाला घाबरायचे. त्यात टिळकांचं मोठं योगदान होतं. राष्ट्राच्या चेतनेला जागवल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याला काही मूल्य नाही. राष्ट्राची चेतना जागवूनच स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं ते म्हणायचे. त्यांनी अनेक उत्सवाच्या माध्यमातून लोकांना संघटीत करण्याचं काम केलं, असं म्हणत शाह यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

तरुणांसाठी टिळक प्रेरणादायी – शाह 

‘शिस्त आणि संविधानाच्या प्रतीचं असलेला भाव हा संविधानाचा भाग आहे. टिळकांचं काम पाहून महात्मा गांधीही म्हणायचे ते लोकमान्य होते. ते लोकप्रिय आहेत. आजच्या तरुणांसाठी टिळक प्रेरणादायी आहे. सर्वांना मी विनंती करतो टिळकांना वाचा. टिळकांची लेखणी कधीच कालबाह्य होणार नाही. जगाला नेहमी प्रेरणा देत नाही. अजित डोवाल यांना पुरस्कार दिला. मी टिळक स्मारक ट्रस्टचं मनापासून आभार मानतो, असे अमित शाह पुढे म्हणाले.

अजित डोवाल यांना टिळक पुरस्कार

‘अजित डोवाल यांना पुरस्कार देण्यासाठी मला बोलावलं. मला संधी दिली. पुरस्कार कामाचं कौतुक करण्याची पद्धत आहे. एखादी व्यक्ती समाजासाठी मोठं काम करतो तेव्हा तो एक व्यक्ती राहत नाही. तो खूप पुढे जातो. अशा व्यक्तींचा सन्मान होतो तेव्हा समाजाच्या कृतज्ञ भावनेचं निर्वहन होतं. अशा व्यक्ती सारखं जगण्याची अनेकांना प्रेरणा मिळते. टिळक पुरस्कार डोवाल यांना मिळाला. प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांना मोठी प्रेरणा मिळेल. याबाबत माझ्या मनात शंका नाही,असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली...
Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान;
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?
आमदार फोडण्यासाठी पैसे, तरुणांसाठी नाहीत; ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल