VIDEO: ले पंगा! बच्चू कडूंचा TikTok व्हिडीओ व्हायरल

बच्चू कडू हे जसे त्यांच्या आंदोलनामुळे परिचीत आहेत, तसेच ते त्यांच्या बिनधास्तपणासाठीही ओळखले जातात. सध्या बच्चू कडूंचा एक TikTok व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • Updated On - 10:45 am, Sat, 8 June 19
VIDEO: ले पंगा! बच्चू कडूंचा TikTok व्हिडीओ व्हायरल

अमरावती : अमरावतीतील अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे त्यांच्या अनोख्या आंदोलनांमुळे चर्चेत असतात. रखडलेल्या कामांचा जाब विचारताना बच्चू कडूंनी अनेकदा अधिकाऱ्यांवर हात उचलला आहे. बच्चू कडू हे जसे त्यांच्या आंदोलनामुळे परिचीत आहेत, तसेच ते त्यांच्या बिनधास्तपणासाठीही ओळखले जातात. बच्चू कडू हे अनेकदा कबड्डीच्या मैदानात पाहायला मिळाले.

सध्या बच्चू कडूंचा कबड्डीच्या मैदानातील एक TikTok व्हिडीओ व्हायरल होत आहे. या टिक टॉक व्हिडीओमध्ये बच्चू कडून कबड्डीची रेड करताना पाहायला मिळतात.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमरावतीत कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळीही बच्चू कडू यांनी आपलं कबड्डीचं कौशल्य दाखवलं होतं. एखाद्या कुशल खेळाडूप्रमाणे बच्चू कडूंनी आपलं कबड्डीचं कौशल्य दाखवलं होतं. त्यावेळीही बच्चू कडूंचा व्हिडीओ लाईक मिळवत होता.

मात्र सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो नेमका कोणत्या स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यानचा आहे, हे समजू शकलेलं नाही.

VIDEO: