Amravati Crime | अजमेर दर्ग्यामधून 20 लाखांचे रत्नजडीत दागिने चोरी; अमरावतीतील महिलेकडे 10 दिवसांनी सापडले

| Updated on: May 20, 2022 | 9:52 AM

दिल्लीतील व्यापारी मोहीम कुरेशी यांच्या पत्नीच्या बॅगेत दागिने होते. दर्शनासाठी ती आली होती. गर्दी होती. पोलिसांनी लॉजवर माहिती घेतली. या महिलेची नोंद होती. अजमेर पोलिसांनी अमरावती पोलिसांशी संपर्क साधला. आरोपी महिलेकडून दागिने हस्तगत केले. राजस्थान पोलिसांच्या ताब्यात आरोपी महिलेला दिले.

Amravati Crime | अजमेर दर्ग्यामधून 20 लाखांचे रत्नजडीत दागिने चोरी; अमरावतीतील महिलेकडे 10 दिवसांनी सापडले
हाच तो वीस लाख रुपयांचा रत्नजळीत दागिना.
Image Credit source: t v 9
Follow us on

अमरावती : नवी दिल्लीत एक व्यापारी (trades) राहतो. त्याची पत्नी इंग्लंडला राहते. ती राजस्थानातील अजमेर दर्गा येथे दर्शनासाठी आली होती. त्यावेळी दर्शन घेत असताना गर्दीतून वीस लाख रुपये किमतीचे दागिने तिच्या बॅगमध्ये होते. ते दागिने लंपास झाले होते. संबंधित महिलेनं अजमेर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी हॉटेल, लॉजमधील माहिती मागविली. त्यात अमरावतीची हबीबनगरमधील (Habibnagar) महिला एका ठिकाणी थांबली होती. सीसीटीव्ही फुटेजवरून (CCTV footage) अजमेर पोलिसांना या महिलेवर संशय आला. अजमेर पोलिसांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांना संबंधित महिलेची माहिती घेण्यास सांगितले. तिच्या घराची झडती घेतल्यानंतर ते रत्नजळीत दागिने चोरल्याचं तिनं कबूल केले. गाडगेनगर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. याची माहिती अजमेर पोलिसांना देण्यात आली. अजमेर पोलिसांनी तिला ताब्यात केली.

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी ताब्यात

अमरावती शहरातील हबीबनगरमध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय आरोपी महिलेला शहर पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले. 9 मे रोजी दिल्लीमधील प्रसिद्ध व्यापाऱ्यांच्या पत्नीचे दागिने अजमेर दर्ग्यावर चोरले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलेचा शोध लागला. आरोपी महिलेने प्रवासात वापरलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. दिल्लीतील व्यापारी मोहीम कुरेशी यांच्या पत्नीच्या बॅगेत दागिने होते. दर्शनासाठी ती आली होती. गर्दी होती. पोलिसांनी लॉजवर माहिती घेतली. या महिलेची नोंद होती. अजमेर पोलिसांनी अमरावती पोलिसांशी संपर्क साधला. आरोपी महिलेकडून दागिने हस्तगत केले. राजस्थान पोलिसांच्या ताब्यात आरोपी महिलेला दिले.

नेमकं काय घडलं

अजमेर दर्ग्यात गर्दी होती. अमरावतीतील महिलेने इंग्लंडच्या महिलेची बॅग लंपास केली. या बॅगमध्ये दागिने होते. हे दागिने सुमारे वीस लाख रुपये किमतीचे होते. सीसीटीव्हीत अमरावतीच्या महिलेवर पोलिसांना संशय आला. त्यावरून तिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर प्रकरणाची खुलासा झाला. आता या चोरट्या महिलेला अजमेर पोलिसांच्या चौकशीचा सामना करावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा