“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही”; सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा होताच, भाजपने ठपका ठेवला

| Updated on: May 03, 2023 | 4:53 PM

राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा आरोप त्यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र एक सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होऊ शकतो मात्र त्या त्या पक्षाची संस्कृती असते ती राष्ट्रवादीमध्ये आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही; सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा होताच, भाजपने ठपका ठेवला
Follow us on

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती आत्मकथानाचे पुनर्प्रकाशन काल पार पडत असतानाच शरद पवार यांनी आपल्य राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीसह त्यांच्या मित्रपक्षाकडून त्यांनी या निर्णय घेऊ नये अशी विनंतीही करण्यात आली. मात्र त्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्यानंतर मात्र आता भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली जात आहे. शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करू नये अशी इच्छा राष्ट्रवादीसह ठाकरे गटाने केली असली तरी, भाजपकडूनही त्यांनी राजकीय निवृ्त्ती घेऊ नये अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती.

मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा ठपका ठेऊन पवार कुटुंबीय हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बाहेरची कोणतीही व्यक्ती बसू देणार नाहीत, त्यामुळे पवार कुटुंबीयही घराणेशाही चालवत असल्याचा ठपका भाजपचे खासदार अनिले बोंडे यांनी ठेवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवार यांनी दिल्यानंतर नवा अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत आहे. त्यावर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

यावर राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राष्ट्रवादीमध्ये घराणेशाही आहे, त्यामुळे ते एका कुटुंबाशिवाय ते दुसऱ्याचा विचार करू शकत नाहीत अशी घनाघाती टीका त्यांनी केली आहे.

तर राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा आरोप त्यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र एक सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होऊ शकतो मात्र त्या त्या पक्षाची संस्कृती असते ती राष्ट्रवादीमध्ये आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अनिल बोंडे यांनी म्हटले आहे की, माणसाला वयोमानानुसार व प्रकृतीनुसार मर्यादा असतात आणि हा सृष्टीचा नियमच आहे. कोणामुळे कोणत्याच देशाचं, कोणत्याच राज्याचं,जनेतचं आणि कोणाचच, कोणामुळे काही विशेष फरक पडत नसतो.

थोड्या वेळापूरत ते निश्चित कमतरता जाणवेल परंतु नंतर लोकांना सवय पडून जाते असं स्पष्ट मतही त्यांनी मांडले आहे. मी काही संजय राऊत नाही आहे बाकीच्या पक्षात चाललेल्या घडामोडींवर मी प्रतिक्रिया द्यावी असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणतात 75 वर्षानंतर व्यक्तीने वाणप्रस्ताश्रमामध्ये जावं. मात्र काही लोकांना एकादा माणूस माणूस हवाहवासा वाटत असला तरी त्याला निवृत्त होण्याचा अधिकार असतो आणि त्या दृष्टीने पाहायला गेलं तर ती योग्यच गोष्ट असते असंही त्यांनी यावेळी सांगितले.