AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, पवारसाहेबांनी विदर्भाच्या जनतेची…

Devendra Fadnavis on Sharad Pawar : अमरावतीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. विदर्भाच्या जनतेची पवारांनी माफी मागावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. अमरावतीत बोलताना देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, पवारसाहेबांनी विदर्भाच्या जनतेची...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 24, 2024 | 5:42 PM
Share

शरद पवार यांनी विदर्भावर अन्याय केला. अमरावतीवर अन्याय केला. यासाठी त्यांनी माफी मागावी. नवनीत राणा यांना पाठिंबा दिला, म्हणून माफी मागण्यापेक्षा पवार साहेबांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. विदर्भाला काहीच दिलं नाही, यासाठी शरद पवारसाहेब यांनी माफी मागावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. अमरावतीत बोलताना शरद पवार यांनी एक खंत बोलून दाखवली होती. 2019 ला नवनीत राणा यांना पाठिंबा दिला, त्यामुळे मी दिलगीर आहे, असं शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले…

अमरावतीत आज महायुतीची सभा होत आहे. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आज ही सभा होतेय. अमित शाह या सभेला उपस्थित आहेत. या सभेला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. अमरावतीचा मी भाचा आहे… माझा मामा, माझी आई अमरावतीची आहे. त्यामुळे जेवढं प्रेम नागपूरवर आहे. तेवढंच अमरावतीवर आहे. नरेंद्र मोदीजी यांची सभा सोडली तर सायन्सस्कोर मैदानावरची सर्वात मोठी सभा आजची आहे. एकीकडे नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी आहे. फैसला तुम्हाला करायचा आहे, असं फडणवीस म्हणाले.

राहुल गांधींवर निशाणा

मनसेसह अनेक पक्ष आपल्यासोबत आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांची खिचडी आहे. त्याच्या आघाडीतील नेते म्हणतात राहुल गांधी अपरिपक्व आहेत. देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरेजी होणार असं संजय राऊत यांनी जाहिर केलंय. ज्यांचा एकही खासदार निवडून येऊ शकत नाही ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

नवनीत राणांचं कौतुक

नवनीत राणा त्या वाघीणीचं नाव आहे. जिला उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी जेलमध्ये पाठवलं. पण त्या घाबरल्या नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आचारसंहिता संपल्यावर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे येणार आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीच्या जनतेला त्यांनी आश्वस्त केलं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा