अमरावती सभेत मोठा राडा; शिवीगाळ केली, माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न, खुर्च्या फेकून मारल्या नवनीत राणांचे आरोप

Navneet Rana Daryapur Sabha Rada : अमरावतीच्या दर्यापूरमध्ये नवनीत राणा यांची सभा झाली. मात्र या सभेत प्रचंड राडा झाला. या सभेत नवनीत राणा यांच्या खुर्च्या फेकण्यात आल्या. या सभेतील व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. नवनीत राणांचे पती रवी राणा यांनी कारवाईची मागणी केलीय.

अमरावती सभेत मोठा राडा; शिवीगाळ केली, माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न, खुर्च्या फेकून मारल्या नवनीत राणांचे आरोप
नवनीत राणांच्या सभेत राडा
Image Credit source: ANI
| Updated on: Nov 17, 2024 | 8:42 AM

सध्या राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्या निमित्त अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात माजी खासदार, भाजप नेत्या नवनीत राणा यांची सभा झाली. या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा झाला आहे. सभेसाठी आलेल्या काही लोकांनी सभेत खुर्च्या फेकत राडा घातला. माजी खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्याचा आरोप केला आहे. या हल्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन आलं होतं. यावेळी हा राडा झाला. लोकांनी खुर्च्या फेकून मारल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

45 जणांवर गुन्हे दाखल

माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडून खल्लार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या राड्यानंतर खल्लार गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल खल्लार पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल जंजाळ यांनी माहिती दिली आहे.

अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार गावात माजी खासदार, भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा झाला आहे. पोलिसांनी 45 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. चार जणांना ताब्यात घेतलं आहे. राडा करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. प्रचार सभेदरम्यान काही लोकांनी काल खुर्च्यांची फेकाफेकी केली होती. नवनीत राणांच्याही अंगावर फेकल्या खुर्च्या होत्या. सध्या खल्लार गावात शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

नवनीत राणांचे गंभीर आरोप

नवनीत राणा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मला पाहून त्या लोकांनी शिवीगाळ केली. माझ्या पोलीस सुरक्षा रक्षकांना देखील मारहाण झाली. मला त्यांनी मारलं माझ्या अंगावर त्यांनी खुर्च्या फेकल्या. माझ्या जातीवर त्यांनी शिवीगाळ केली. माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न झाला. आरोपींना जर अटक झाली नाही तर अमरावती जिल्ह्यातील सगळा हिंदू समाज या ठिकाणी एकत्र येईल, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.