AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवनीत राणा या आधुनिक झाशीच्या राणी, देवेंद्र फडणवीस यांचा भाषणात उल्लेख

मेळघाट येथील महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत राणा यांचे कौतुक करत त्यांना आधुनिक झाशीची राणी म्हटले. त्यांनी मेळघाटच्या विकासासाठी अनेक योजनांची घोषणा केली, ज्यात 24 तास मोफत वीज, स्काय वॉकचे काम पूर्ण करणे आणि दुधाचे दर वाढविण्याचे प्रयत्न यांचा समावेश आहे. फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आणि आदिवासी कल्याण योजनांचा उल्लेख केला.

नवनीत राणा या आधुनिक झाशीच्या राणी, देवेंद्र फडणवीस यांचा भाषणात उल्लेख
नवनीत राणा आणि देवेंद्र फडणवीस
| Updated on: Nov 10, 2024 | 5:15 PM
Share

महायुतीची अमरावतीत आज सभा पार पडली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार नवनीत राणा यांचा आधुनिक झाशीची राणी म्हणून उल्लेख केला. “माझ्या आजोबांचं घरसुद्धा मेळघाटमध्ये होतं. नवनीत राणा येथील मुलगी आहे. तर मी देखील इथला मुलगा आहे. मेळघाटमध्ये नवनीत राणा यांना तुम्ही लीड दिला. मी तुम्हाला रामराम करतो. पण आपल्यासोबत बेईमानी झाली. जो राम को लाये हैं, उनको आपको लाना है. हमने हमारा काम किया हैं, अब आप की बारी हैं. नवनीत राणा यांनी मेळघाटसाठी ज्या मागण्या मागितल्या त्या पूर्ण करु. दुधाला जास्त भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“महाविकास आघाडी सरकार आल्यावर इथल्या कामावर रोख लागली. स्काय वॉकचं काम थांबवण्याचे पाप महाविकास आघाडीच्या सरकारने केलं. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज मिळेल”, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “नवनीत राणा यांनी माझ्याकडून मेळघाटला दत्तक घ्यावं. मी सर्व परीने मदत करेन”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

‘तुम्ही प्रपोजल करा, पूर्ण करायची जबाबदारी माझी’

“मेळघाट असे मतदान करेल की संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे रेकॉर्ड तुटेल. जो राम को लायेंगे हम उनको लायेंगे असा आमचा नारा आहे, हम राम को लाये है आता त्यांना आणायची जबाबदारी तुमची आहे”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केलं. “निवडणुकीआधी आणि नंतरही नवनीत राणांनी मेळघाटशी संपर्क ठेवला. मेळघाट हा त्यांचा परिवार आहे. नेर ते खंडवापर्यंतचा रस्ता पूरा करायचा आहे, अशी राणांची मागणी आहे. याचे श्रेय ते मला देतात. पण कारवाई त्यांनी करुन घेतली. स्काय वॉकचेही काम पूर्ण होणार आहे. तुम्ही प्रपोजल करा. पूर्ण करायची जबाबदारी माझी”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मेळघाटची रबडी प्रसिद्ध आहे. आम्ही रबडी खाण्यासाठी यायचो”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “दुधावर प्रक्रिया करणारा व्यवसाय इथे सुरू करावा. 100 टक्के सबसिडी देऊन पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. दुधाला जास्त भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे सरकार तुमचं सरकार आहे, मुख्यमंत्री असताना मेळघाटात विकासकामे केले”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आदिवासी समाजासाठी सरकारने बिरसा मुंडा योजना आणली. 4000 कोटी रुपये दिले. आदिवासींच्या घरापर्यंत रस्ते जातील, वीज जाईल पाणी जाईल, घर बनतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासींसाठी 24000 करोड रुपये दिले. कमिशनखोर आमदार असेल तर कसे चालेल? आम्ही पैसे देऊ तो खिशात टाकेल”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राजकुमार पाटील यांच्यावर टीका केली.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.