AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nupur Sharma : 54 वर्षीय व्यक्तीची हत्या, नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने कृत्य?, प्राथमिक अंदाज

Nupur Sharma : 54 वर्षीय व्यक्तीची हत्या, नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने कृत्य केल्याचा अंदाज...

Nupur Sharma : 54 वर्षीय व्यक्तीची हत्या, नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने कृत्य?, प्राथमिक अंदाज
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jul 02, 2022 | 3:06 PM
Share

अमरावती : अमरावतीत एका 54 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. उमेश कोल्हे (Umesh Kolhe) असं या व्यक्तीचं नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या व्यक्तीचं स्वत:चं मेडिकल आहे. 21 जून 2022 ला उमेश रात्री उशीरा आपल्या मेडिकलमधून परतत असताना या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात गाठलं. अन् चाकूने वार करत त्यांची हत्या केली. हत्येचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी काही दिवसांआधी सोशल मीडियावर त्यांनी नुपूर शर्माच्या (Nupur Shrama) समर्थनार्थ पोस्ट शेअर केली. त्याचाच राग मनात धरून ही हत्या झाली असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. उदयपूरमध्ये दोन मुस्लिम तरुणांनी कन्हैयालालची हत्या केल्याच्या आठवडाभर आधी ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे.

अमरावतीत हत्या

अमरावतीत एका 54 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. उमेश कोल्हे असं या व्यक्तीचं नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या व्यक्तीचं स्वत:चं मेडिकल आहे. 21 जून 2022 ला उमेश रात्री उशीरा आपल्या मेडिकलमधून परतत असताना या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात गाठलं. अन् चाकूने वार करत त्यांची हत्या केली. हत्येचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी काही दिवसांआधी सोशल मीडियावर त्यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली. त्याचाच राग मनात धरून ही हत्या झाली असल्याचं बोललं जात आहे.

या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अजूनही बेपत्ता आहे. उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत कोल्हे याने अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुदस्सीर अहमद आणि 25 वर्षीय शाहरुख पठाण या दोघांना 23 जून रोजी अटक करण्यात आली. अब्दुल तौफिक (24), शोएब खान (22) आणि अतिब रशीद (22) या तिघांना 25 जून रोजी अटक करण्यात आली होती. तर मुख्य आरोपी शमीम अहमद फिरोज अहमद हा अद्याप फरार आहे.

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर

कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट व्हॉट्सअॅपवर शेअर आणि फॉरवर्ड केली होती. हा मेसेज त्याने मुस्लिम लोक असलेल्या ग्रुपवरही केला. त्यामुळे या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याने ही हत्या झाल्याचा संशय आहे.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली