Anil Bonde : ज्यांनी पाप केलं, त्यांची धुग धुग वाढली असेल, मोहित कंबोजांच्या ट्वीटवर अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 17, 2022 | 4:21 PM

अनिल बोंडे म्हणाले, कोणताही घोटाळा असो त्याची फाईल बंद करू नये. जोपर्यंत त्यामध्ये काही केलेले नाही असं सिद्ध होईल किंवा शिक्षा झाली पाहिजे. कारण ही लोकांची भावना आहे.

Anil Bonde : ज्यांनी पाप केलं, त्यांची धुग धुग वाढली असेल, मोहित कंबोजांच्या ट्वीटवर अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया
खा. अनिल बोंडे
Follow us on

अमरावती : मोहित कंबोज यांच्या ट्वीटमुळे (Tweet) अनेकांची धडधड निश्चितच वाढली असेल. आता कोणाचा नंबर लागणार आहे. हे मोहित कंबोज यांनाच माहीत असेल आहे, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल बोंडे यांनी दिली. मोहित कंबोज यांनी ट्वीट करत वादाला पुन्हा तोंड फोडले. नवाब मलिक (Nawab Malik) व अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना भेटायला आणखी एक राष्ट्रवादीचा नेता जाणार असल्याचं ट्वीट मोहित कंबोज यांनी केलंय. त्यामुळं आता नंबर कुणाचा अशी चर्चा सुरू झाली आहे. अनिल बोंडे म्हणाले, अ वरचा नेता जाणार आहे की ब वरचा नेता जाणार आहे. शिवसेनेचा जाणार की कोणत्या पक्षाचा जाणार आहे. परंतु तेवढी गोष्ट खरी आहे ज्यांनी ज्यांनी पाप केले आहे त्याच्या मनात धुग धुग् वाढली असेल येवढं निश्चित आहे.

घोटाळेबाजांना शिक्षा झाली पाहिजे

अनिल बोंडे म्हणाले, कोणताही घोटाळा असो त्याची फाईल बंद करू नये. जोपर्यंत त्यामध्ये काही केलेले नाही असं सिद्ध होईल किंवा शिक्षा झाली पाहिजे. कारण ही लोकांची भावना आहे. लोकांना वाटतं की जनतेचा पैसा कोणी नेता खात असेल तर त्याला तो पैसा पचू नये. ही जनतेची भावना देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार त्याचा आदर करतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर प्रतिक्रिया देताना अनिल बोंडे म्हणाले, एकनाथ आणि देवेंद्र ही देवांची नावे आहेत. नाना पटोले यांनी इडी इडी जर केलं तर एकनाथ आणि देवेंद्रच नाव घेतलं, तर त्याच भलं होऊन जाईल.

मराठी माणसांचं खच्चीकरण कशासाठी?

राष्ट्रवादीच्या रुपाली ढोंबरे पाटील म्हणाल्या, मोहित कंबोज कोण आहेत, त्यांना ईडी, सीबीआयची माहिती कशी मिळते. कंबोज हे काही अधिकारी आहेत का. भाजपचे परप्रांतीय नेते हे मराठी माणसांचं खच्चीकरण करण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्रातील विरोधकांचं खच्चीकरण काम करत आहेत. आधी किरीट सोमय्या आणि आता मोहित कंबोज यांच्यामागं कोणतं षडयंत्र आहे, याचं उत्तर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, असा सवालही त्यांनी विचारला.

हे सुद्धा वाचा