AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांच्या समर्थनातूनच! आरोपींनी टेररिस्ट गँग तयार केली होती? NIA च्या आरोपपत्रात आणखी काय खुलासा?

अमरावतीत 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांच्या समर्थनातूनच! आरोपींनी टेररिस्ट गँग तयार केली होती? NIA च्या आरोपपत्रात आणखी काय खुलासा?
उमेश कोल्हे यांच्या मारेकऱ्याची जामिनासाठी न्यायालयात धावImage Credit source: social media
| Updated on: Dec 17, 2022 | 11:06 AM
Share

अमरावतीः भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यामुळेच उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या झाली होती, असा खुलासा NIA ने केला आहे. कोल्हेंच्या हत्येसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अमरावतीचे फार्मासिस्ट उमेश कोल्हे प्रकरणात नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी अर्थात NIA ने ११ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय.

उमेश यांनी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. एनआयएने ११ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. आरोप पत्रात दावा केलाय की, मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या व्हॉट्सअप पोस्ट उमेश यांनी शेअर केल्या होत्या. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी एक टेररिस्ट गँग तयार केली होती.

विशेष एनआयए कोर्टात हे आरोपपत्र सादर करण्यात आलं. उमेश कोल्हेंचे मारेकरी फरार असून त्यांचा तपास सुरु ठेवावा, अशी एनआयएची विनंती कोर्टाने मान्य केली.

या आरोपपत्रात अब्दुल शेख, मोहम्मद शोएब, आतिब राशिद, युसूफ खान, इरफान खान, अब्दुल अरबाज, मुशफिक अहमद, शेख शकील, शाहिम अहमद, मुदस्सिर अहमद आणि शाहरूख खान यांचा समावेश आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

एनआयएने काय म्हटलंय?

एनआयएने आरोपपत्रात म्हटलंय, 21 जून 2022 रोजी अमरावतीच्या घंटाघर परिसरात आरोपींनी दहशत पसरवण्याच्या हेतूने उमेश कोल्हे याची निर्घृण हत्या केली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने भारतीय दंड संहितेच्या कलम 120, 302, 153-अ सहित इतर कलमांनुसार, 2 जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता.

आतापर्यंत काय घडलं?

एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला. नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकीही आली होती. भाजपने नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ काहींनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या होत्या. उमेश कोल्हेदेखील त्यापैकीच एक होते. या पोस्टमुळेच कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी एनआयएने दाखल केलेले हे पहिले आरोपपत्र आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.