वाशिम : अमरावती महामार्गावर भीषण अपघात; अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू

| Updated on: Feb 28, 2022 | 8:30 AM

वाशिम जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक आणि मालवाहू ऑटोरिक्षामध्ये भीषण अपघात झाला. या घटनेत ऑटोरिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील अमरावती महामार्गावर असलेल्या शेलू वाडा परिसरात हा अपघात घडला.

वाशिम : अमरावती महामार्गावर भीषण अपघात; अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू
Follow us on

वाशिम : जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. ट्रक आणि मालवाहू ऑटोरिक्षामध्ये (Rickshaw) भीषण अपघात झाला. या घटनेत ऑटोरिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील अमरावती (Amravati) महामार्गावर असलेल्या शेलू वाडा परिसरात हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच  मृत्यू झाला. जावेद शेख असे या चालकाचे नाव आहे. ते  आपल्या रिक्षामध्ये भाजीपाला घेऊन कारंजाकडे जात होते. याचदरम्यान अमरावती महामार्गावर ट्रकने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातात रिक्षाचा चुरडा झाला. अपघाताची बातमी मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण समोर येऊ शकलेले नाही. अपघातानंतर घटनास्थळी भाज्यांचा सडा पडला होता.

कारंजाकडे जात असताना अपघात

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जावेद शेख हे एक रिक्षा व्यवसायिक आहे. ते आपल्या रिक्षामधून भाजीपाला घेऊन कारंजाकडे निघाले होते. त्यांची रिक्षा अमरावती महामार्गावरील शेलू वाडा परिसरात आली असता त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात जावेद शेख यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाल्यानंतर रिक्षा उलटल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विखूरला होता.

वाहनांचे नुकसान

या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. रिक्षाचा समोरचा भाग पूर्णपणे डॅमेज झाला आहे. रिक्षाच्या स्थितीवरूनच या अपघाताची भीषणता लक्षात येते. दरम्यान अद्याप अपघाताचे कारण समोर आले नसून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले, पतीचं टोकाचं पाऊल

हॉटेलच्या खोलीत घुसून तरुणीची हत्या, चार वर्षांपासून रुम बुक करणारा मित्र संशयाच्या भोवऱ्यात

प्रेयसीच्या नकारामुळे केला होता आत्महत्येचा प्रयत्न; पाच वर्षांनंतर तुरुंगातून झाली सुटका