दर्ग्यासमोरील दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं, पुजाऱ्याची हत्या करण्याचं कारण काय?

| Updated on: Sep 20, 2022 | 1:54 PM

भाविकांकडून पैसे घेण्याला विरोध केला म्हणून अन्वर बेग या मुजाची (पुजारीची) हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य एकाला अटक केली आहे.

दर्ग्यासमोरील दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं, पुजाऱ्याची हत्या करण्याचं कारण काय?
घरगुती भांडणातून पतीकडून पत्नीची हत्या
Image Credit source: t v 9
Follow us on

सुरेंद्रकुमार आकोडे

अमरावती : दडबडशहा दर्ग्यावर आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री दुहेरी हत्याकांडाची (double murder case) थरारक घटना घडली. या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. बडनेरा शहरापासून अंदाजे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणी पोलीस स्टेशनच्या (Loni Police Station) हद्दीतील ही घटना. भाविकांकडून पैसे घेण्याला विरोध केला म्हणून अन्वर बेग या मुजाची (पुजारीची) हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य एकाला अटक केली आहे.

या दुहेरी हत्याकांड प्रकरणी लक्ष्मण गोरख पिगळे वय 41 याला अटक करण्यात आली आहे. तो नंदुरबार जिल्ह्यातील तळवे येथील रहिवासी आहे. त्याला हत्येसाठी सहकार्य दीपक पन्ना यानं केलं होतं. दीपक हा अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खडेशवर तालुक्यातील रहिवासी आहे.

15 सप्टेंबर रोजी बडनेरा जवळील शेत शिवारातील दडबडशहा दर्ग्यावर राहणाऱ्या दोघांची निर्घृण हत्या झाल्याची माहिती समोर आली होती. या दर्ग्यावर निवासी असलेला अनवर बेग व तेथेच राहणारा तौफिक शेख राहत होते. मध्यरात्री आरोपींनी या दोघांची हत्या केली होती.

आरोपी गोरख पिगळे हा दहा वर्षांपासून दर्ग्यावर राहत होता. तेव्हा भाविकांकडून पैसे घेत होता. हे मात्र पुजारी असलेल्या अनवर बेगला पटत नव्हते. तो आरोपी लक्ष्मण गोरख पिंगळेला विरोध करायचा. यातून त्यांचे अनेकदा भांडण झाले. यातूनच अनवरची लक्ष्मणने हत्या केली आहे.

भाविकाकडून पैसे कशाला घ्यायचं म्हणून विरोध केला. पण, हीच बाब खटकली. यातून हे हत्याकांड झाल्याच पोलिसांनी उघड केलं. आता दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. खडी फोडल्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नाही.