Valentine’s Day | अमरावतीत अनोखा उपक्रम, व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला जोडप्यांनी केले रक्तदान; यामागचे कारण काय?

व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. याचे निमित्त साधून काही जोडप्यांनी रक्तदान केले. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठीही हा अनोखा उपक्रम....

Valentines Day | अमरावतीत अनोखा उपक्रम, व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला जोडप्यांनी केले रक्तदान; यामागचे कारण काय?
रक्तदान करताना दाम्पत्य
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 6:22 PM

अमरावती : प्रेम हे प्रेम असते, तुमचं आमचं सेम असतं. व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) कसा साजरा करायचा हे ज्याचे त्याच्यावर अवलंबून असते. परदेशातून आलेला डे असला, तरी आपल्याकडं हा मान्यता पावलेला दिवस. मग, आपणही समाजासाठी काही करू शकतो. परोपकार जोपासू शकतो, यासाठी हे रक्तदान शिबिर (Blood donation camp) घेण्यात आले. विशेष म्हणजे काही जोडप्यांनी रक्तदान करून आपले प्रेम व्यक्त केले. चौदा फेब्रुवारी हा प्रेमाचा व प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. मात्र व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला अमरावती येथील जाजोदीया कुटुंबाच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं. अमरावती येथील अग्रेसर भवन इथं पती -पत्नींनी संयुक्त रक्तदान केलं. यावेळी शहरातील जोडप्यांनी व ज्यांचं प्रेम विवाह झालाय, अशांनी रक्तदान केलं. व्हॅलेंटाईन डेच्या एकमेकांना शुभेच्छा (Good luck to each other) दिल्या. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला या अनोख्या रक्तदान शिबिराची जिल्हाभर चर्चा रंगली आहे.

सामाजिक संदेश दिला गेलाय

प्रेमाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी सामाजिक कार्याची झालर पती-पत्नीने रक्तदान करून दिली. सामाजिक संदेश देणारा हा व्हॅलेंटाईन डे होय. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, आई-वडील यांचे नाते अधिक दृढ करणारा असा दिवस. मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रेमाचा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली. तर अमरावतीमध्ये व्हॅलेंटाईन डेला सामाजिक कार्याची झालर रक्तदान करून चढविण्यात आली आहे. पाश्चिमात्य संस्कृतीतील सण. पण, व्हॅलेंटाईन डे आता भारतीय संस्कृतीत रुजू लागलाय. अन्य सणांप्रमाणे या दिवसाचीही जय्यत तयारी केली जाते. तरुणाईत फुलणारे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. म्हणूनच या दिवसाचे औत्सुक्य अधिक आहे. आता इतरांनी हा दिवस कसा साजरा करायचा, हे ठरवावे, म्हणजे दिवस सार्थकी जाईल.

Nagpur | तुमचा पाल्य वसतिगृहात शिकतो, काय आहेत नियम?; काय म्हणतात, समाज कल्याण आयुक्त जाणून घ्या

Nagpur Police | मालकाच्या नावाचा बनावट मेल; पैसे तिसऱ्याला पाठवायला सांगितले, फेक अकाउंट निघाल्याने अडचण

Nagpur Accident | टायर फुटल्याने कार डिव्हायडरवर धडकली; नागपुरातील कोंढाळीजवळ अपघात, तीन जण जागीच ठार