AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amruta Fadnavis : कधी गरज पडली तर फक्त सांगा, सदैव मदतीला तयार, अमृता फडणवीस यांचा जनतेला शब्द!

यावेळी आमदार सुरेश धस यांनी अमृता फडणवीस यांना फेटा बांधून त्यांचा सन्मान आणि स्वागत केले. या शिबीरासाठी जिल्ह्यातुन लाखो लोक दाखल झाले.

Amruta Fadnavis : कधी गरज पडली तर फक्त सांगा, सदैव मदतीला तयार, अमृता फडणवीस यांचा जनतेला शब्द!
amruta fadnavis and suresh dhasImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 3:00 PM
Share

Amruta Fadnavis : बीड जिल्ह्यातील आष्टी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुरेश धस हे या आरोग्य शिबिराचे आयोजक होते. या शिबीराच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार सुरेश धस यांनी अमृता फडणवीस यांना फेटा बांधून त्यांचा सन्मान आणि स्वागत केले. या शिबीरासाठी जिल्ह्यातुन लाखो लोक दाखल झाले. या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास डॉ. तात्याराव लहाने हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. भाषणात त्यांनी आरोग्यविषयक काही मदत लागली तर मला सांगा. मी मदत करायला तयार आहे, असा शब्द उपस्थित नागरिकांना दिला.

येथे मेडिकल कॉलेज नक्कीच पाहिजे

या आरोग्य शबिरात 30 हजार लोक तपासणी करून गेले आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त वापर करून घ्या. सुरेश धस यांना मी धन्यवाद देते. सुरेश धस आष्टीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय हवे, असे सांगितले. धस जे बोलतायत ते योग्य आहे. येथे मेडिकल कॉलेज नक्कीच पाहिजे. आपल्याकडे पद आल्यानंतर आपण सत्ता मोठी करायची असते कारण सत्ता मोठी झाली तर माणूस मोठा होत असतो, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

कधी कोणाला गरज पडली तर…

तसेच, त्यांनी सुरेश धस यांचेही कौतुक केले. सुरेश धस तुमच्यासाठी (नागरिकांसाठी) पूर्णपणे सक्रिय आहेत. तुम्हाला काही मदत लागली तर मीदेखील सदैव उपलब्ध आहे. कधी कोणाला गरज पडली तर मी त्याची मदत करेल, असा शब्द अमृता फडणवीस यांनी दिला. तसेच सुरेश धस यांनी अशा कार्यक्रमांना मला सतत बोलवत राहावे. मला लोकांमध्ये जायला आवडते, अशी विनंतीही सुरेश धस यांना केली. या कार्यक्रमात सुरेश धस यांनी अमृता फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. अमृता फडणवीस वेगवेगळ्या समाजघटकाची सेवा करण्याचे काम करतात, असे सुरेश धस म्हणाले.

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद