
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत रोज 2 तास मोबाईल टीव्ही न पाहण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनगरमध्ये रोज सायंकाळी 7 ते 9 पर्यंत मोबाईल आणि टीव्हीचा वापर बंद राहणार आहे.

अनगरच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुलांच्या आरोग्य आणि भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असं प्राजक्ता पाटील यांनी म्हटलं आहे.

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या नगराध्यक्षांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले आहे. अनेकांनी हा निर्णय फायद्याचा असल्याचे म्हटले आहे.

संध्याकाळी सात ते नऊ या वेळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून या निर्णयाचे कौतुक होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या सर्वांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत अशी माहिती प्राजक्ता पाटील यांनी दिली आहे.