अनिल परबांचे गंभीर आरोप, थेट म्हणाले, मुख्यमंत्री योगेश कदमांना का वाचतात? मुली नाचून जे लोक…

अनिल परब यांनी नुकताच योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केली आहेत. मंत्रिमंडळातून योगेश कदम यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. राज्याला नेहमी कलंकित करणारे गृहराज्यमंत्री मिळाल्याचे परबांनी म्हटले.

अनिल परबांचे गंभीर आरोप, थेट म्हणाले, मुख्यमंत्री योगेश कदमांना का वाचतात? मुली नाचून जे लोक...
Anil Parab
| Updated on: Oct 09, 2025 | 12:40 PM

अनिल परब यांनी नुकताच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केली आहेत. हेच नाही तर मंत्रिमंडळातून योगेश कदम यांची हकालपट्टी करा, असे त्यांनी म्हटले. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी करणार आहोत. जर त्यांनी असे केले नाही तर आम्ही हा मुद्दा अधिवेशनात मांडणार आहोत. आम्ही योगेश कदम विरोधात कोर्टात जाणार आहोत. राज्याला नेहमी कलंकित करणारे गृहराज्यमंत्री मिळाले. योगेश कदम यांचे अनेक कारनामे आपल्यासमोर ठेवले आहेत. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गँगवार सुरू आहेत. सरकारचं पाठबळ आयतं मिळतं. हे सिद्ध झालंय.

निलेश घायवळ प्रकरण चर्चेत आहे. त्याचे गुंड थैमान घालत आहेत. रस्त्यावर उतरलेल्या माणसांवर गोळीबार करत आहेत. त्याच्या भावाला सचिन घायवळला योगेश कदम यांनी शस्त्र परवाना मंजुर केला आहे. शस्त्र परवाना घेण्याची पद्धत असते. अर्ज करावा लागतो. तो स्क्रूनिटीला जातो. स्थानिक पोलीस त्याची चौकशी करतात. त्याच्यावर किती गुन्हे आहेत. ते पाहतात. त्याच्या घरची परिस्थिती पाहतात. शस्त्र परवान्याची गरज आहे का पाहतात.

पोलिसांनी नाकारल्यानंतरही सचिन घायवळला योगेश कदम यांनी शस्त्र परवाना मंजुर केला. अनिल परब यांनी थेट इशारा देत म्हटले की, मुली नाचून जे लोक भाड खातात, त्यांना मुख्यमंत्री कधीपर्यंत वाचवणार हे देखील आम्ही पाहणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री अशा कलंकित लोकांना वाचवत आहेत. मुळात म्हणजे मुख्यमंत्र्यांनी योगेश कदम यांना पाठिशी घातले आहे. पोलिसांनी सचिन घायवळला परवाना नाकारलेला असताना योगेश कदम यांनी त्यांना परवाना दिला.

योगेश कदम आपल्या खुर्चीचा अपमान करत आहेत. मुख्यमंत्र्यांची नेमकी काय अडचण आहे हे मला माहिती नाही. योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायला हवी, ही आमची शिवसेनेची भूमिका आहे. आता तुमची सुटका होऊ शकत नाही, असे अनिल परब यांनी म्हटले. आता रामदास कदम किंवा योगेश कदम यावर नेमके काय बोलतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.