रामदास कदम यांच्या अडचणी वाढणार? पुतण्याच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी; अनिल परबांच्या आरोपाने खळबळ

Anil Parb on Ramdas Kadam : रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल परब यांनी काही धक्कादायक खुलासे केली आहेत. हेच नाही तर परबांनी 1993 मध्ये रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी जाळून घेतले होते की, त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा थेट प्रश्न उपस्थित केलाय.

रामदास कदम यांच्या अडचणी वाढणार? पुतण्याच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी; अनिल परबांच्या आरोपाने खळबळ
Anil Parab and Ramdas Kadam
| Updated on: Oct 04, 2025 | 1:19 PM

रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता अनिल परब यांनी काही धक्कादायक खुलासे केली आहेत. हेच नाही तर रामदास कदमांनी नार्काे टेस्ट करत पण 1993 मध्ये त्यांच्य पत्नीने स्वत: जाळून घेतले की, जाळले, याचीही नार्काे टेस्ट व्हावी, असे थेट त्यांनी म्हणत आरोप केला. यासोबतच खेडमध्ये काय काय सुरू आहे हे आम्ही येणाऱ्या अधिवेशनात मांडू असेही त्यांनी म्हटले. मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलं आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर आरोप आहे. अशा शिशुपलांना तुम्ही का वाचत आहात. तुमची अशी काय मजबुरी आहे. त्यांना का वाचवत आहेत.

पुढे अनिल परबांनी म्हटले की, रामदास कदम यांनी कुणाकुणाच्या जमिनी लाटल्या, ढापल्या याची माहिती लोक देत आहेत. दादागिरी करुन बेघर केलं आहे. त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या का केली. याचा शोधही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे. त्याचंही कारण बाहेर आलं पाहिजे. घरातील लोक आत्महत्या केलं पाहिजे. कशासाठी. त्याचं कारण काय. मुळाशी जा. चौकशी करा. काय घडलंय.

दारू पिऊन जो काही खेडमध्ये धुमाकूळ सुरू आहे. त्याची वाच्यता अधिवेशनात होईल. मागच्या अधिवेशनात तर दोनच प्रकरण आली बाहेर. या अधिवेशनात पुराव्यासकट प्रकरणं देणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही किती वेळा यांना वाचवणार. तुम्ही किती वेळा बदनामी करताय सरकारची. तुमचं सरकार यांच्या मुळे डागळलं जातंय. मुख्यमंत्र्यांनी प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी असे नासके आंबे हाकलून दिले पाहिजे.

आज गृहराज्य मंत्र्याची ताकद दाखवताना डान्सबारवर जाऊन रेड मारल्याचं दाखवताना, मग स्वत: च्या घरात काय चाललंय त्याची चौकशी करा. हेच नाही तर त्यांनी पुढे म्हटले की, 1993 मध्ये तुझ्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला. स्वत: ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्याची चौकशी केली पाहिजे. नार्को टेस्ट झाली पाहिजे. ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, जाळून घेण्याचा प्रयत्न केला. जाळून घेतलं की जाळलं? आजही खेडमध्ये घटनेचे साक्षीदार आहेत. गरज पडली तर त्यांनाही मी समोर आणेल. खूप साक्षीदार आहेत. म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही संस्कृती बंद करा, असे त्यांनी म्हटले.

मी शिवसेनेची अधिकृत भूमिका सांगतो. दोघांची नार्को टेस्ट करतो. मीही शिवसेनेचा आमदार म्हणून सांगतो की, 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी जाळून घेतलं की त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला याचीही नार्को टेस्ट करण्याची मी मागणी करत आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व नार्को टेस्ट मान्य कराव्यात, असे अनिल परब यांनी म्हटले.