AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास कदम अडचणीत? बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच्या दाव्यानंतर थेट अब्रुनुकसानीचा दावा, अनिल परबांचे गंभीर आरोप

माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात एक खळबळ उडाली. रामदास कदम यांनी दिवंगत नेते तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी दावे केले आहेत. आता अनिल परब यांनी अत्यंत मोठा दावा केला आहे.

रामदास कदम अडचणीत? बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच्या दाव्यानंतर थेट अब्रुनुकसानीचा दावा, अनिल परबांचे गंभीर आरोप
Anil Parab and Ramdas Kadam
| Updated on: Oct 04, 2025 | 12:24 PM
Share

नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला. यावेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात एक खळबळ उडाली. रामदास कदम यांनी दिवंगत नेते तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी दावे केले आहेत. बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवला? याचा तपास करावा असे त्यांनी म्हटले. रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली. मी हे फार मोठं विधान करतो आहे, असेही त्यांनी म्हटले. त्यानंतर राजकारणात मोठा भूकंप आला. आता अनिल परब यांनी अत्यंत मोठा दावा केला आहे.

अनिल परबांनी थेट म्हटले की, मी रामदास कदम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करत आहे. रामदार कदम यांची नार्काे टेस्ट झालीच पाहिजे. योगेश कदम यांनी बापाचे उद्योग तपासली पाहिजेत. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युपत्राचा मी स्वत: साक्षीदार आहे. रामदास कदम हे भाडगिरी करणारे लोक आहेत. 1993 मध्ये कदमांच्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले की, जाळले हे तपासले पाहिजे, असा थेट गंभीर आरोप अनिल परब यांनी म्हटले.

पुढे परबांनी म्हटले की, 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी स्वत:ला जाळून का घेण्याचा प्रयत्न केला की, त्यांना जाळले हे तपासले पाहिजे. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचे वाकून हे सुरू आहे. दारू पिऊन तिकडे खेडमध्ये काय धुमाकूळ घालता हे आम्ही अधिवेशनात मांडू असे म्हणत त्यांनी मोठा इशारा दिला. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युबद्दल शंका उपस्थित करता. मी यांना कोर्टात खेचणार आहे. यांना माफी मागावीच लागणार आहे.

माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, नार्काे टेस्ट झालीच पाहिजे पण 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी स्वत:ला जाळून का घेतले याचीही नार्काे टेस्ट करा. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आम्ही लगेचच बाळासाहेबांचा मृत्यु जाहीर केला. त्यामुळे हा जो आरोप केला आहे, त्या आरोपाचे सत्य बाहेरच आले पाहिजे. मेलेल्या माणसाचे ठसे घेतल्यावर त्याचा काहीही उपयोग होत नाही. कदमांनी माफी मागावी, नाही तर कायदेशीर कारवाई करणारच असे अनिल परबांनी स्पष्ट म्हटले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...