
राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याच्या पत्नीने आत्महत्या करत आयुष्य संपवले. अनंत आणि गाैरी पालवे गर्जे यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात आता गाैरीचा पती अनंत गर्जे, बहीण शीतल गर्जे आणि दिरावर गुन्हा दाखल केला. गाैरी गर्ज डॉक्टर होती. काल दुपारी 1 वाजता ड्युटी करून गाैरी आपल्या राहत्या बीडीडी चाळच्या घरी पोहोचली होती. अनंत गर्जेच्या अनैतिक संबंधाची माहिती गाैरीला मिळाली होती. बीडीडी चाळीतून ते शिफ्ट होत होते त्याचे पॅकिंग सुर होते. यादरम्यान तिला गर्भपाताचे काही कागदपत्रे मिळाली. त्या कागदपत्रांमध्ये किरण इंगळे महिलेचे नाव होते जिचा गर्भपात करण्यात आला आणि पतीच्या नावे अनंत गर्जे याचे नाव होते. हे पाहिल्यानंतर गाैरी गर्जे आणि अनंत गर्जे यांच्यातील वाद टोकाला गेला. मात्र, त्यानंतर गाैरीने त्याला माफ केले.
गाैरीला समजले की, तो अजूनही चॅटिंग करत आहे. गाैरी तणावात होती. तिला अनंत गर्जेकडून त्रास दिला जात होता. या प्रकरणात गंभीर खुलासे होत आहेत. गाैरीने अनंत गर्जेची तक्रार आपल्या ननंदेकडे केली होती. मात्र, ननंदेने स्पष्ट सांगितले की, तुला राहायचे असेल तर त्याच्यासोबत राहा नाही तर आम्ही त्याचे दुसरे लग्न करून देतो. गाैरीने याबद्दल आपल्या आई वडिलांना देखील माहिती दिली होती. हेच नाही तर तिने काही स्क्रीनशॉर्ट तिच्या वडिलांनाही पाठवली होती.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केली आहेत. अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडेंना अत्यंत मोठे आव्हान केले आहे. अंजली दमानिया यांनी म्हटले की, पंकजा मुंडेंनी एका मुलीसाठी उभं राहावं आणि सांगावं हा माझा पीए असला तरी त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. त्याची चौकशी नीट होऊन, त्याने गुन्हा केला असेल तर कारवाई करावी.
गाैरी गर्जे हिच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडे यांनी त्यांचे सर्व नियोजित दाैरे रद्द केली आहेत. गाैरी गर्जे हिच्या मामांनी अगोदरच स्पष्ट केले की, या प्रकरणाशी पंकजा मुंडे यांचे काहीच देणे घेणे नाही. त्यांना अनंत गर्जे कसा माणूस आहे, याची देखील काहीच कल्पना नव्हती. डॉक्टर असलेल्या गाैरीने आत्महत्या केल्यानंतर आता एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.