AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एक बॉम्ब, नवं कारण देत धनंजय मुंडेंचा मागितला राजीनामा, दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले असून, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे.

आणखी एक बॉम्ब, नवं कारण देत धनंजय मुंडेंचा मागितला राजीनामा, दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
| Updated on: Feb 19, 2025 | 4:52 PM
Share

आज पुन्हा एकदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली.  त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्रिमंडळातील निर्णय असल्याचं खोटं सांगून मुंडे पत्र पाठवतात. मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचे सांगून मुंडेंनी भ्रष्टाचार केला. विधानसभेचा खर्च काढण्यासाठी खोटा जीआर काढण्यात आला. आयएफएफसीओमध्ये घोटाळा झाला असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या दमानिया? 

‘अनेक लोकांना, काही काही पक्षांच्या प्रवक्त्यांना असं वाटतंय की मी जे जे मांडत आहे, मग ते ऑफिस ऑफ प्रॉफिट असो, कृषी घोटाळा असो हे सर्व मांडण्याची गरज काय? धनंजय मुंडे यांचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध काय? आणि संतोष देशमुखांची जी हत्या झाली, त्याबद्दल सर्वांना जो आक्रोश आहे, आणि या प्रकरणात आतापर्यंत आपल्याला नीट कारवाई होताना दिसत नाहीये. अपेक्षित कारवाई होताना दिसत नाहीये, म्हणूनच मला वाटत आहे की, जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत या हत्येच्या शोधाला नीट दिशा मिळणार नाही.

म्हणूनच मी आधी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत ते दाखवले. मग कराड आणि धनंजय मुंडे हे एकत्र कंपन्यात कसे ते दाखवलं. त्यांचे आर्थिक व्यवहार असो कंपन्या असो, दहशत असो, नफा असो हे सगंळ मी दाखवलं. एका राज्य मंत्र्याला राज्यातील कंपनीकडून थेट नफा मिळतोय. त्या बॅलन्ससिटवर धनंजय मुंडेंची सही आहे, मात्र तरीही काही झालं नाही. त्यानंतर चार दिवस थांबून मी कृषी घोटाळा काढला. त्यात नॅनो युरीयाचा घोटाळा कसा झाला हे मी समोर आणलं. त्याच्यानंतर मी नॅनो युरीया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल देखील मागवल्या. मागवलेल्या बॉटलचा इनव्हाईस मी ट्विट केला. मात्र एवढं सगळं घडून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नसतील तर कमाल आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

Follow Us
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा