जगात जर्मनी भारतात परभणी, जिंतूरची लेक ठरली ‘मिसेस एशिया युनिव्हर्स’

जगात जर्मनी भारतात परभणी, जिंतूरची लेक ठरली 'मिसेस एशिया युनिव्हर्स'
अंजली यांनी 50 पेक्षा जास्त वेळा त्यांनी ब्युटी पिजंट स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून यशस्वी भूमिका

जिंतूर शहरातील एका सामान्य कुटुंबातील लेक अंजली संपत कोला-पोर्जे ही मिसेस एशिया युनिव्हर्स ठरली आहे. (Anjali Porje Asia Universe)

prajwal dhage

|

Jan 17, 2021 | 11:16 AM

परभणी : जिंतूर शहरातील एका सामान्य कुटुंबातील लेक अंजली संपत कोला-पोर्जे (Anjali Sampat Kola-Porje) ही मिसेस एशिया युनिव्हर्स ठरली आहे. अंजली यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्युटी पिजंट या स्पर्धेत पाचव्या श्रेणीत जगभरातून आलेल्या 60 विवाहित महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ही स्पर्धा राजस्थानमधील जयपूर येथे मिसेस युनिव्हर्स प्रा.लि. तर्फे आयोजित करण्यात आली होती. अंजली यांच्या या यशामुळे परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

अंजली या परभणी जिल्ह्यीतील जिंतूर या छोट्याशा शहरातून आलेल्या आहेत. त्यांना लहानपणापासून फॅशन आणि डिझायनिंगमध्ये आवड होती. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण शहरातील एकलव्य बालविद्या मंदिर विद्यालयातून घेतले. तर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबाद गाठले. या काळात त्यांनी आपला मॉडेलिंग, फॅशनिंगचा  छंद जोपासला. (Anjali Sampat Kola-Porje becomes Mrs. Asia Universe)

स्वप्नांना नवऱ्याचे पाठबळ 

अंजली यांचे 2009 साली औरंगाबदमधील इंलेक्ट्रिकल इंजिनिअर संपत पोर्जे यांच्याशी लग्न झाले. अंजली यांना लहानपणापासूनच फॅशनिगं, मॉडेलिंग आणि डिझायनिंगची आवड असल्यामुळे लग्न झाल्यानंतर त्या हे छंद जोपासू शकतील का?, अशी शंका त्यांच्या मनात येत होती. मात्र, संपत यांनी त्यांची बायको म्हणजेच अंजली यांना प्रोत्साहन देत त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं. आपल्या नवऱ्याच्या साथीनेच त्या हे यश संपादन करु शकल्या असं त्या सांगतात.

आतापर्यंत 50 पेक्षा जास्त स्पर्धांमध्ये परीक्षक

अंजली यांना फॅशन जगताची खूप आवड आहे. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षापासून मॉडेलिंग, फॅशन, ग्रुमिंग ट्रेनर आणि इव्हेन्टच्या क्षेत्रात पदार्पण केले. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी 50 पेक्षा जास्त वेळा त्यांनी ब्युटी पिजंट स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून यशस्वी भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. बरं इथेच न थांबता त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सलग 8 महिने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित केलेल्या ब्युटी पिजंट या स्पर्धेत भाग घेतला.

अशा झाल्या मिसेस युनिव्हर्स

हा खिताब जिंकण्यासाठी अंजली यांनी प्रचंड मेहनत घेतली. मिसेस युनिव्हर्स प्रा.लि.तर्फे ब्युटी पिजंट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून स्पर्धेत आपले नाव निश्चित केले. या स्पर्धेत मिसेस युनिव्हर्सच्या पाचव्या श्रेणीत जगभरातून 60 विवाहित महिलांनी सहभाग नोंदविला होता. नंतर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी 5 महिलांची निवड करण्यात आली होती. या 5 महिलांमधून अव्वल ठरत अंजली यांनी ‘मिसेस एशिया युनिव्हर्स 2021’च्या खिताबाचा क्राऊन माथी सजवून घेण्यात यश मिळवले. त्यांच्या या अद्वितीय यशामुळे सबंध आशियामध्ये जिंतूरच्या नावलौकिकात भर पडली आहे, अशी परभणी आणि जिंतूरकरांची भावना आहे.

संबंधित बातम्या :

Shrutika Mane | भारतीय नारी जगात भारी! ‘ठाण्याची लेक’ श्रुतिका माने ठरली ‘ऑस्ट्रेलिया मिस इंडिया’ची विजेती

Rutuja Ravan | मीरा रोडच्या मराठमोळ्या तरुणीचा देशात डंका, ऋतुजा रावणला ‘मिस इंडिया’चे उपविजेतेपद

(Anjali Sampat Kola-Porje becomes Mrs. Asia Universe)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें