AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: अण्णांचे शिर्डीत जंतरमंतर, माध्यमांशी बोलताना अण्णांना अश्रू अनावर, तब्येत बरी…

Anna Hazare Video: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची तब्येत नीट नाही. तरीही त्यांना शिर्डीतील वाडीया पार्कच्या गांधी मेमोरियल येथे काही मिनिटे मौनव्रत धारण केले आणि थोड्या वेळाने त्यांना अश्रू अनावर झाले...

VIDEO: अण्णांचे शिर्डीत जंतरमंतर, माध्यमांशी बोलताना अण्णांना अश्रू अनावर, तब्येत बरी...
Anna hazare news
| Updated on: Jul 23, 2026 | 6:49 PM
Share

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शिर्डीत आंदोलन सुरु केले आहे.अण्णा हजारे यांनी नीट परीक्षा घोटाळ्यात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. शिर्डीतील वाडीया पार्क येथे गांधी मेमोरियल येथे अण्णांनी मौन आंदोलन छेडले आहे. अण्णा हजारे यांची तब्येत ठीक नसूनही त्यांनी या मौन आंदोलनात सहभागी होत काही काळी मौन व्रत धारण केले. नंतर अण्णा मंचावरुन निघून केले. तरीही मौन व्रत आंदोलन सुरुच होते.

राळेगण सिद्धी येथील यादवबाबा मंदिरात राहणारे अण्णा हजारे यांनी शिर्डीतील या मौन व्रत आंदोलनात आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. शिर्डीतील या आंदोलनात अण्णांनी सहभागी होत दिल्लीच्या जंतरमंतर आंदोलना आपला पाठींबा दिला. येथील वाडिया पार्कच्या गांधी मेमोरियल पार्कमध्ये मौन व्रत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अण्णा हजारे यांचे वय झाले असून त्यांची तब्येतही अलिकडे बरी नसते. त्यांनी तरीही या मौनव्रत आंदोलनात सहभाग घेतला. येथे मौन व्रत धारण केल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांना आंदोलन सुरुच ठेवण्याचे सांगत ते निघून गेले.

अण्णा हजारे यांनी दिल्लीत जंतरमंतर आंदोलकांवर लाठीमार झाल्याच्या घटनेबद्दल परवा आपली पहिली प्रतिक्रीया देताना लाठीमार का झाला हे माहिती नाही. मात्र, प्रश्न सलोख्याने सोडवायला हवेत अशी प्रतिक्रीया दिली होती.

अण्णा हजारे यांची मोदींना चिट्टी –

दिल्लीत साल २०१४ मध्ये युपीए सरकार जाऊन एनडीए सरकारचे सत्तेतील वापसीला अण्णा हजारे यांची भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने हातभार लावला होता. तसेच त्यांचे चेले अरविंद केजरीवाल यांचा राजकारणात उदयही त्यामुळेच झाला. त्यावेळी देशाचे दुसरे गांधी अशी प्रतिमा त्यांची झाली होती. आता पुन्हा जंतरमंतर आंदोलन सुरु झाले असताना अण्णा कुठे आहेत, असा सवाल केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अण्णा हजारे यांनी लिहिले आहे की हिंसा आणि पोलिसांची कारवाई ही खूपच वेदनादायी आहे. त्यांनी पुढे लिहिले की निदर्शकांचे असंतोष कायदा – सुव्यवस्थेच्या समस्येच्या रुपात नव्हे, तर समाजाची वेदना आणि अपेक्षा म्हणून पाहायला हवा.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने सरकार पडणार नाही

अण्णा हजारे यांनी लिहिले की जर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी होत आहे. मात्र, त्यामुळे सरकार कोसळणार नाही. त्याऐवजी त्यांची कार्यप्रणाली अधिक उत्तरदायी आणि प्रभावी बनेल. त्यांना सरकारला निदर्शकांच्या मागण्या धैर्यपूर्वक ऐकाव्यात आणि विश्वासाचे वातावरण तयार करावे आणि सकारात्मक संवादाद्वारे यावर तोडगा शोधून काढण्याचे आवाहन केले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की पीएम मोदी यांना पत्र यासाठी लिहिले की पंतप्रधान देशाचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांना जनतेच्या मुद्दे माहिती व्हावे..

अण्णांचा व्हिडीओ येथे पाहा –

Follow Us
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट