AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा सालियान प्रकरणात मोठी अपडेट, सीबीआयने दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवला

दिशा सालियान प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सीबीआयने दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे. आता या प्रकरणात लवकरच गुन्हा दाखल होईल अशी माहिती वकिलांनी दिली आहे.

दिशा सालियान प्रकरणात मोठी अपडेट, सीबीआयने दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवला
| Updated on: Sep 11, 2026 | 7:22 PM
Share

दिशा सालियान प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सीबीआयने दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे. आता या प्रकरणात लवकरच गुन्हा दाखल होईल अशी माहिती वकिलांनी दिली आहे. या प्रकरणात जे -जे आरोपी आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ज्या -ज्या गोष्टी आहेत, त्या-त्या गोष्टी आम्ही सादर केल्या आहेत, असं या प्रकरणावर बोलताना वकिलांनी माहिती दिली आहे. दरम्यान आता वडिलांचा जबाब नोंदवल्यानंतर लवकरच या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे दिशा सालियान प्रकरण?

दिशा सालियान हिचा 8 जून 2020 रोजी संशयास्पद रित्या मृत्यू झाला होता. मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशा सालियानचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी दिशा सालियानच्या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद केली होती. दिशा सालियानच्या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद करून स्थानिक पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाच्या शेवटी दिशा सालियानचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचं जाहीर केलं. दिशा सालियानने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं. त्यानंतर हे प्रकरण बंद करण्याची तयारी सुरू असतानाच दिशाच्या वडिलांनी पोलिसांचा हा निर्णय फेटाळून लावला. त्यांनी या प्रकरणात हाय कोर्टात धाव घेतली. आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान आता या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. या प्रकरणात आता सीबीयाने दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे.

वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार  सीबीआयने दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे. आता लवकरच या प्रकरणात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.  या प्रकरणात जे -जे आरोपी आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ज्या -ज्या गोष्टी आहेत, त्या-त्या गोष्टी आम्ही सादर केल्या आहेत, असं या प्रकरणावर बोलताना वकिलांनी माहिती दिली आहे. दरम्यानच्या काळात या प्रकरणात सीबीआयच्या तपासातून अनेक गोष्टी देखील समोर आल्या आहेत.

Follow Us
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं