शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का, थेट गोकुळ मुद्द्यात घरचा आहेर, एकनाथ शिंदे..
गोकुळच्या मुद्द्यावर वाद चिघळला आहे. सतेज पाटील कोल्हापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता महायुतीमधील वाद हा पुढे आला. शिंदेंच्या शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केल्याने महायुतीला धक्का बसला.

गोकुळ संघावर राज्य सरकारने चार संचालक नेमले आहेत. ज्यानंतर जोरदार टीका केली जात आहे. विरोधकांकडून टीका होत असतानाच सतेज पाटील यांनीही गंभीर आरोप केले. सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांनी नाकारले, कोर्टात दिलासा मिळणार नाही, यानंतर मंत्रिमंडळात यांनी आदेश काढल्याचे त्यांनी म्हटले. सतेज पाटील यांनी सरकारच्या या निर्णयानंतर प्रतिक्रिया देत थेट मोठी घोषणा केली. हेच नाही तर कोल्हापूरमध्ये मोठ्या मोर्चाची घोषणा केली. 9 तारखेला हा मोर्चा काढला जाणार आहे. सतेज पाटील आणि विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोकुळ संघ ताब्यात घेण्याचा हा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला. गोकुळ संघावर चार संचालक का नेमले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सतेज पाटलांकडे बहुमत असताना सरकारने ही नेमणूक केल्याने सर्व गणितच फिसकले.
त्यातच आता गोकुळच्या मुद्द्यावरून महायुतीमधील धुसपूस पुढे येत आहे. गोकुळमध्ये शासन नियुक्त चार सदस्य निवडीवरून शिवसेना नाराज आहे. लोकशाही मार्गाने जे सदस्य निवडून आले आहेत, त्याचा आपण स्वीकार आणि जो जनतेने कौल दिला आहे त्याचा आपण सन्मान केला पाहिजे, असे थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे म्हणणे आहे.
भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेशी शिवसेना सहमत नाही, असे स्पष्ट मत शिवसेनेने म्हटल्याचे विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यामुळे आता पुन्हा महायुतीमधील वाद पुढे आला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपा यांच्यात कमालीचा वाद उफाळला आहे. पदवीधर निवडणुकीवरून वाद उफाळून आला.
आता गोकुळवरून महायुतीत हालचाली वाढल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केली. गोकुळमध्ये जे सदस्य लोकशाही मार्गाने निवडून आले, ते स्वीकारले पाहिजे, अशी शिंदेंची भूमिका आहे. चार संचालक गोकुळवर नियुक्त केल्याने दोन्ही पक्षातील वाद हा चांगलाच वाढताना दिसत आहे. यावर आता नक्की काय तोडगा निघतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. राहुल गांधी यांनीही यावर भाष्य केले होते.